''माओवाद्यांचं मराठा आरक्षणाला पाठिंब्याचं पत्रं म्हणजे सरकारसाठी धोक्याची घंटा''

''माओवाद्यांचं मराठा आरक्षणाला पाठिंब्याचं पत्रं म्हणजे सरकारसाठी धोक्याची घंटा''
vinyak

सोलापूर - शिवसंग्रामचे Shivsangram अध्यक्ष विनायक मेटे Vinyak Mete यांचा आज मराठा आरक्षणाच्या Maratha Reservation पार्श्वभूमीवर सोलापूर Solapur दौरा होता. या दरम्यान त्यांनी सोलापुरात पत्रकार परिषद घेतली. यावेळी माओवाद्यानी मराठा मोर्चाला दिलेलं पाठिंब्याचं पत्रं म्हणजे सरकारसाठी धोक्याची घंटा असल्याचं मेटे म्हणाले.तसेच मराठा आरक्षणाची जनजागृती करण्यासाठी सध्या दौऱ्यावर असून २६ जून रोजी औरंगाबाद Aurangabad येथे मेळावा घेणार असल्याचे मेटे यांनी जाहीर केलं. vinyak mete on maratha reservation

हे देखील पहा -

सोलापूरला देखील जुलैच्या पहिल्या आठवड्यात मेळावा घेण्यात येईल.त्यानंतर ३६ जिल्ह्यात मेळावे घेणार असून विभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितलं.  २७ जूनला मुंबईला १० हजार बाईकची रॅली काढण्यात येणार असून ५ जुलै पर्यंत सर्व प्रश्न सुटले नाहीत तर ७ जुलै रोजी होणारे अधिवेशन चालू देणार नाही असा इशारा  मेटे यांनी दिला आहे. 

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com