WTC Final: विराट-विल्यमसनची कामगिरी निराशजनक; संघांच्या चिंतेत वाढ

WTC Final: विराट-विल्यमसनची कामगिरी निराशजनक; संघांच्या चिंतेत वाढ
virat-kane

विश्व कसोटी अजिंक्यपदाचा (World Test Championship) अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात 18 जून ते 22 जून दरम्यान साऊथॅम्प्टनच्या एजिस बाऊल मैदानावर खेळला जाणार आहे. तथापि, या सामन्यापूर्वी, दोन्ही संघांचा त्रास म्हणजे त्यांच्या कर्णधाराचा बाहेरच्या मैदानावरील फॉर्म. केन विल्यमसन आणि विराट कोहली दोघेही 2019 पासून परदेशी मैदानावर काही खास कामगिरी करू शकलेले नाहीत. विल्यमसनने न्यूझीलंड बाहेरच्या मैदानावर शेवटच्या नऊ डावांमध्ये केवळ 95 धावा केल्या आहेत. यात फक्त 5 वेळा त्यांला दुहेरी धावसंख्या करता आली आहे. त्याचबरोबर कोहलीला 10 डावांमध्ये 275 धावा करता आल्या आहेत.( Virat-Williamson's performance disappointing; Increased team anxiety)

इंग्लंडविरुद्द विल्यमसची खराब कामगिरी 
अंतिम सामन्यापूर्वी न्यूझीलंडचा संघ सध्या इंग्लंडविरुद्ध 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. लॉर्ड्स येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात विल्यमसनने 13 आणि 1 धावा केल्या होत्या. पहिल्या डावात जेम्स अँडरसन आणि दुसऱ्या डावात ओली रॉबिन्सनने त्याला बाद केले. यापूर्वी ऑगस्ट 2019 मध्ये त्याने श्रीलंकेविरूद्ध गॅले येथे 0 आणि 4 आणि कोलंबोमध्ये 20 धावा केल्या होत्या. त्याच वेळी, डिसेंबर 2019 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध फक्त 34, 14, 9 आणि 0 धावा करता आल्या.

हे देखील पाहा

3 वेळा फिरकी तर 6 वेळा वेगवान गोलंदाजांनी केले बाद
विल्यमसन फिरकी गोलंदाजीवर 3 वेळा आणि वेगवान गोलंदाजीवर 6 वेळा बाद झाला आहे. तिन्ही फिरकी गोलंदाजांनी त्याला झेलबाद केले. तर वेगवान गोलंदाजांनी त्याला 3 वेळा झेलबाद केले, 2 वेळा एलबीडब्ल्यू केले आणि एकदा त्रिफळाबाद (Clean Bowled) केले. अशा परिस्थितीत भारताचा जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah), इशांत शर्मा (Ishant Sharma) आणि मोहम्मद शमी विल्यमसनवरती भारी पडू शकतात. अश्विन आणि जडेजा यांच्या फिरकीचाही भारतीय संघाला फायदा होईल.

विराट आणि विल्यमसन दोघेही मुख्य फलंदाज
विल्यमसन आणि विराट हे दोघेही आपापल्या संघाचे मुख्य फलंदाज आहेत. विल्यमसन न्यूझीलंडकडून तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजी करतो. त्याचवेळी विराट चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येतो. अशा परिस्थितीत हे दोघेही परकीय भूमीवर खराब फॉर्मात असल्याने त्यांची टीम अडचणीत येऊ शकते.

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com