मुंबईच्या रेल्वे स्थानकावरील वॉटर व्हेडिंग मशीन लवकरच काढणार?
Water Vending Machine Mumbai Railway Stations

मुंबईच्या रेल्वे स्थानकावरील वॉटर व्हेडिंग मशीन लवकरच काढणार?

मुंबई : रेल्वे (Railway) स्थानकांवर प्रवाशांना थंडगार पिण्याचे पाणी (Water) कमी किमतींत  उपलब्ध व्हावे, म्हणून वॉटर व्हेडिंग मशीन लावण्यात आले आहेत . मात्र, ऐन उन्हाळ्यात आता ही मशीन बंद झाली आहेत, वॉटर व्हेडिंगच्या कंत्राटदाराने परवाना शुल्क आणि इतर शुल्क न भरल्याने या मशीन बंद करण्यात आल्यात आहेत. Water Vending Machines on Mumbai Railway Stations may be Closed

केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (Catering and Tourism Corporation Limited) या कंपनीकडून मध्य आणि हार्बर मार्गावरील रेल्वे (Railway) स्थानकांवर एकूण 83 वॉटर व्हेडिंग मशीन २०१७ साली बसविण्यात आली होती. ही वॉटर व्हेडिंग मशीन चालविण्याकरिता खासगी कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली होती. या मशिनमुळे प्रवाशांना कमी खर्चात पाण्याची तहान भागवता येत होती.

मात्र, येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन कंत्राटदाराकडून रखडले आहे. कंत्राटदाराने परवाना शुल्क आणि इतर शुल्क न भरल्याने मशीन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अर्थ वॉटर लिमिटेड या कंपनीने सर्व शुल्क  व मशीन दुरुस्ती 30 दिवसात केली नाही. तर सर्व मशीन स्थानकातून काढण्यात येण्याची शक्यता आहे. परिणामी ऐन उन्हाळ्यात प्रवाशांसाठी थंड पाण्याची सुविधा बंद होईल का, असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. Water Vending Machines on Mumbai Railway Stations may be Closed

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com