न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर १५ दिवसांत परीक्षा घेऊ -  दिनकर पाटील

न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर १५ दिवसांत परीक्षा घेऊ -  दिनकर पाटील
dinkar

पुणे - कोरोनाच्या Corona या महाभयंकर आजाराच्या पार्श्वभूमीवर इयत्ता दहावीच्या परीक्षा Exam  रद्द करण्यात आल्या, तर बारावीच्या परीक्षा या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र आता दहावी-बारावीच्या परीक्षा घेण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात Mumbai High Court  निर्णय प्रलंबित असला तरी परीक्षा घेण्याची पूर्ण तयारी आधीच झालेली होती अशी माहिती महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम संशोधन मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील Dinkar Patil यांनी दिली आहे.  We will take the exam in 15 days after the decision of the court

हे देखील पहा -

याशिवाय विभागीय मंडळ आणि शाळांपर्यंत परीक्षेचे साहित्य पोहचवण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीची परिक्षा सुरुवातीला पुढे ढकलण्यात आली होती. नंतर मात्र ती रद्दच करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. मात्र त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर, सरकारने त्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे.

पालकांसह विद्यार्थ्यांमध्ये कोरोनामुळे दोन मतप्रवाह असल्याचे सरकारने सांगितले आहे. न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर १५ दिवसांत परीक्षा घेऊ शकतो अशीही माहिती देमहाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम संशोधन मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com