एकनाथ खडसे वेगळा विचार करणार? व्यथा मांडण्यासाठी खडसे दिल्ली दरबारी

एकनाथ खडसे वेगळा विचार करणार? व्यथा मांडण्यासाठी खडसे दिल्ली दरबारी

जळगाव : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खड़से आज दिल्लीत दाखल झाले आहेत. दिल्लीत पक्षनेतृत्वाची भेट घेऊन एकनाथ खडसे आपले गाऱ्हाणं, अध्यक्षांसमोर मांडणार आहेत. तसंच पक्षातून जाणीवपूर्वक दूर करण्यात येत असल्याची खंत देखील खडसे बोलून दाखवणार असल्याची माहिती आहे. तसंच नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत रोहिणी खडसेंच्या पराभवाला भजपमधील लोकच कारणाभूत असल्याचा खडसेंचा आरोप आहे. 

याआधी पत्रकारांशी बोलताना खडसेंनी खुलासा केला होता की, भाजपाचा अन्याय असाच सुरु राहिला तर नक्कीच वेगळा विचार केला जाईल. आता या वेगळ्या विचाराचा अर्थ नेमका काय आहे? हे या नाराजीनाट्यानंतरच्या घाडमोडींवरच अवलंबून आहे. यासह त्यांनी गिरीश महाजनांचे नाव न घेता त्यांच्यावरही टीकेची झोड उठवलीय. भाजपात ओबीसी नेत्यांना कशा प्रकारे डवललं गेलं? याचा उल्लेख करत पक्ष वाढवण्यासाठी भाजपात मेहनत करणाऱ्या लोकांना टार्गेट केलं जात असल्याचं खडसेंनी स्षष्ट केलं. यासह भाजपमध्य़े गोपीनाथ मुंडेंसारख्या नेत्यालाही कशाप्रकारे त्रास देण्यात आला होता हे जनतेसमोर आहे. त्यामुळे मी माझी भूमिका दिल्लीत अध्यक्षांसमोर जाऊन मांडणार असल्याचं खडसेंनी सांगितलं.

आता खडसे दिल्लीत जाऊन काय चर्चा करणार? भाजप त्यांची नाराजी दूर करण्यास यशस्वी होणार की नाही? खडसेंच्या वेगळा विचार म्हणजे नेमकं काय? अशा वेगवेगळ्या प्रश्नांना फाटे फुटतायत. मात्र या सर्व प्रश्नांची उत्तरं नक्कीच लवकरच समोर येतील. त्यामुळे खडसेंच्या भूमिकेवर सर्वांचं लक्षन लागलंय.

ताज्या अपडेट्स आणि बातम्यांच्या सविस्तर विश्लेषणासाठी पाहात राहा...
साम टीव्ही न्यूज ||LIVE||

पाहा अन्य बातम्या व्हिडीओ स्वरुपात
SUBSCRIBE करा आमचं YOU-TUBE Channel
Link - www.youtube.com/user/SaamTV

फेसबूक आणि ट्विटरवरही आम्हाला फॉलो करा
Facebook - www.facebook.com/SaamTV/
Twitter - www.twitter.com/saamTVnews

साम टीव्ही
बातमी जी व्यवस्था बदलेल!

Web Title - Eknath Khadse will meets to parliament president.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com