महापौरपदासाठी आरक्षण जाहीर

 महापौरपदासाठी आरक्षण जाहीर

मुंबई - राज्यातील २७ महापालिकांच्या महापौर पदाच्या आरक्षणाच्या सोडती आज नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर- पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आल्या. बृहन्मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिकसह आठ महापालिकांचे महापौरपद खुल्या संवर्गासाठी असणार आहे.

बृहन्मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह इतर महापालिकांचे महापौर, उपमहापौर; तसेच पदाधिकारी, नगरविकास विभागाचे सहसचिव पांडुरंग जाधव, अवर सचिव सचिन सहस्रबुद्धे, कक्ष अधिकारी श्रीमती निकिता पांडे, महापालिकांचे अधिकारी या वेळी उपस्थित होते. महापौर, सहसचिव जाधव; तसेच महापालिकांच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते चिठ्ठी काढून महापौर पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. विशेषत: प्रवर्गातील महिला आरक्षणाच्या सोडती महिला पदाधिकाऱ्यांच्या हस्ते काढण्यात आल्या.

प्रारंभी आरक्षण सोडतीबाबतच्या तरतुदी सांगण्यात आल्या. आरक्षण सोडत नियम २०१७ मधील तरतुदीनुसार या सोडत काढण्यात आल्या. अनुसूचित जमातीचे आरक्षण सोडत काढताना २००७ पासून अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असलेल्या महापालिकांना सोडतीतून वगळण्यात आले; तसेच इतर संवर्गासाठी आरक्षण सोडत काढताना सध्या त्या संवर्गाचे आरक्षण असलेल्या महापालिकांना वगळण्यात येऊन अन्य महापालिकांतून आरक्षण काढण्यात आले.


 
Web Title: municipal mayor post draw politics

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com