25 वर्षांच्या मैत्रीत शिवसेना काय शिकली - नाना पटोले

25 वर्षांच्या मैत्रीत शिवसेना काय शिकली - नाना पटोले
Nana Patole

अकोला - शिवसेना भाजप यांची 25 वर्ष मैत्री होती. त्यातुन शिवसेनेने काय शिकलें आहे, हे त्यांनी आधी पहावे. आम्हाला सांगू नये, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सामनाच्या अग्रलेखावरून शिवसेनेला Shivsena मारला आहे. What did Shiv Sena learn from 25 years of friendship - Nana Patole

सामना Saamna वृत्तपत्रातून प्रकाशित झालेल्या लेखाबद्दल ते बोलत होते. नाना पटोले Nana Patole यांची अकोल्यात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.

आम्हाला भाजपकडून BJP काहीच शिकायचे नाही. काँग्रेस Congress जनतेच्या, शेतकऱ्यांच्या गोरगरिबांच्या  आशीर्वादाने सत्तेत राहिली आहे, मोठ्या उद्योगपतीच्या आशीर्वादाने नाही असे पटोले म्हणाले.

काँग्रेस पक्षाने नेहमीच देशाला पुढे नेण्याचे काम केले. बेरोजगारांना रोजगार देण्याचे काम केले. म्हणून ज्या पक्षाने  सात वर्षात देशाला विकण्याचे काम केले त्यांच्या पासून आम्हाला शिकायची काही गरज नाही, शिकण्याची इच्छा ही नसल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

हे देखील पहा -

एकीकडे पेट्रोल, डिझेल, शेतीची औषधे आणि खतांचे भाव वाढत असताना, जाणीवपूर्वक शेतकऱ्यांच्या मालाला कमीभाव मिळाला पाहिजे अशी योजना केंद्र सरकार कडून आखली जात आहे. याचा निषेध काँग्रेस करत आहे असेही ते म्हणाले.

काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचं नाना पटोले यांनी जाहीर केलं आहे.

Edited By : Krushnarav Sathe 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com