मनसुख हिरेन यांचा मृत्यू नक्की कशामुळे? गूढ वाढले

मनसुख हिरेन यांचा मृत्यू नक्की कशामुळे? गूढ वाढले
Mansukh Hiren

मुंबई : ठाण्यातील Thane व्यावसायिक Businessman मनसुख हिरे Mansukh Hiren यांच्या हत्येप्रकरणी Murder तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) NIA व्हिसेरा अहवाल प्राप्त झाला असून त्यात मनसुख यांचा मृत्यू कोणतेही विष देऊन करण्यात आला नसल्याचे स्पष्ट नमुद करण्यात आले आहे.  What exactly caused the death of Mansukh Hiren 

व्हिसेरा अहवालानुसार मनसुख यांच्या शरीरात विषारी पदार्थाचा कोणताही अंश सापडला नसल्याचे नमुद करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यापूर्वी शवविच्छेदन अहवालात मनसुख हिरेनच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झालेले नव्हते.

शवविच्छेदन अहवालानुसार, मनसुख यांच्या डोळ्याजवळ आणि चेहऱ्यावर छोट्या जखमा होत्या. तसेच त्यांच्या पाठीवर दोन ठिकाणी जखमा असल्याचे बोललं जात आहे. What exactly caused the death of Mansukh Hiren 

त्यामुळे मनसुख हिरेन यांच्या मृत्यूबाबतचा संशय आणखी बळावला होता. शवविच्छेदन अहवालमध्ये जखमांबाबत उल्लेख होता. मनसुख यांचा मृतदेह 8 ते 10 तास पाण्यात पडून होता. त्यामुळे पाण्यातील काही जीवांमुळे या जखमा झाल्यात का याबद्दल खुलासा होणे बाकी होते.

हे देखील पहा -

या जखमा नेमक्या कधी झाल्यात हे यात नमूद होणे आवश्यक होते. मात्र त्यात हे नमूद करण्यात आलेले नाही. मनसुख हिरेन यांचा मृत्यू 12 ते 14 तासांपूर्वी झाला असल्याचे शवविच्छेदन अहवालाद्वारे स्पष्ट झाले होते. पण मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट न झाल्यामुळे याप्रकरणी व्हिसेरा चाचणीसाठी नमुने पाठवण्यात आले होते.

Edited By : Krushnarav Sathe 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com