वसई विरारसह पालघर जिल्ह्यात काय चालू राहील!

वसई विरारसह पालघर जिल्ह्यात काय चालू राहील!
What will continue in Palghar district including Vasai Virar

वसई / विरार -  वसई विरार महापालिकेसह Municipal Corporation पालघर जिल्ह्याचा निर्बंध स्तर 3 मध्ये समावेश झाला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सकाळी 7 ते 4 वाजेपर्यंत दुकान shop चालू ठेवण्यास परवानगी मिळाली आहे.  What will continue in Palghar district including Vasai Virar

एक महिन्यापासून बंद Closed for a month  असलेली दुकान आज सकाळी 7 वाजता उघडली आहेत. त्यामुळे दुकानाची साफसफाई Shop Cleaning करत दुकानदारांनी समाधान व्यक्त केले आहे. लॉकडाऊनमध्ये Lockdown सर्व व्यवहार ठप्प झाल्याने दुकान व्यापाऱ्यासह छोटे-मोठे व्यापाऱ्यांचे सर्व व्यवहार ठप्प झाले होते. 

अनेकांचे भाडे थांबले तसेच लाईट बिल भरायचे बाकी आहे अशा परिस्थितीत मेटाकुटीला आलेल्या व्यावसायिकांना आता 4 वाजेपर्यंत दुकान सुरू ठेवण्यास परवानगी मिळाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. वसई विरारसह पालघर जिल्ह्यात काय चालू राहील ते जाणून घेऊया. 

हे देखील पहा - 

* अत्यावश्यक सेवेतील दुकाने व आस्थापना सोमवार ते रविवार सकाळी 2 ते 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. 

* अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते 4 पर्यंत सुरू राहतील, शनिवार रविवार पूर्णपणे बंद राहतील. 

* मॉल्स, सिनेमागृह, नाट्यगृह पूर्णपणे बंद राहतील. 

* रेस्टॉरंट सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील, 4 नंतर पार्सल सेवा सुरू राहील, 
आणि शनिवार रविवार फक्त पार्सल सेवा सुरू राहील. 

* लोकल ट्रेनसाठी बृहमुंबई महापालिकेने लागू केलेले आदेश लागू राहतील. 

* सार्वजनिक उधाने, मैदान, चालणे, सायकलिंग  सकाळी 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत सुरू राहतील. 

* खाजगी आस्थापना दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. 

* कार्यालयीन उपस्थिती 50 टक्के क्षमतेने सुरू राहातील. 

* खेळ सोमवार ते रविवार सकाळी 5 ते सकाळी 9 आणि सायंकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत सुरू राहतील. 

* शुटिंग चित्रीकरण बबल च्या आत मध्ये सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहतील, बाहेर फिरता येणार नाही. 

* सामाजिक, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रम ,सोमवार ते शुक्रवार 4 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील. 

* विवाह समारंभास 50 व्यक्ती तर अंत्यविधीसाठी  20 माणसांची उपस्थिती असणार. 

* बैठका, निवडणुका, वार्षिक सर्वसाधारण बैठका 50 टक्के उपस्थिती. 

* बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी राहणाऱ्या मजुरांवर बांधकाम करता येईल, त्यांना 4 वाजता सुट्टी देणे बंधनकारक आहे.

* कृषीविषयक सर्व कामे 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. 

* ई कॉमर्स नियमित सुरू राहतील. 

* वसई विरार महापालिका क्षेत्रात सायंकाळी 5 पर्यंत जमावबंदी राहील तर 5 नंतर संचारबंदी राहणार आहे. 

* जिम, सलून , ब्युटीपार्लर, स्पा, सोमवार ते रविवार सायंकाळी 4 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील, वातानुकूलतेचा वापर करता येणार नाही, 
प्रत्येकाला वेळ ठरवूनच बोलवावे लागेल. 

* सार्वजनिक वाहतून 100 टक्के आसन क्षमतेने चालू राहणार , उभे राहून  प्रवास करता येणार नाही. 

* अंतर जिल्हा प्रवास नियमित सुरू राहतील, परंतु निर्बंध स्तर लेवल 5 मधील जिल्ह्यामध्ये जाण्याकरिता किंवा जिल्ह्यामधून वाहतूक करताना थांबणार असतील तर ई पास आवश्यक राहील. 

Edited by - Puja Bonkile 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com