आता Whatsapp वर येणार  नवं फीचर येणार

आता Whatsapp वर येणार  नवं फीचर येणार

नवी दिल्ली - लवकरच युजर्स गुगल असिस्टेंटच्या माध्यमातून व्हॉट्सअ‍ॅप कॉल करू शकणार आहेत. गुगलचं लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम आहे. व्हॉट्सअ‍ॅप देखील आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर आणत असतं. व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी आता एक खूशखबर आहे. कारण व्हॉट्सअ‍ॅपने युजर्सचं चॅटींग आणखी मजेशीर व्हावं या उद्देशाने नवं फीचर आणलं आहे. 

गुगल असिस्टेंट थर्ड पार्टी चॅटिंग अ‍ॅपच्या मदतीने मेसेज सेंड करण्याची सुविधा देतं. मात्र युजर्स यावरून व्हिडीओ कॉल करू शकत नव्हते. पण आता ते शक्य होणार आहे. गुगल असिस्टेंटवरून व्हॉट्सअ‍ॅप व्हिडीओ कॉल हे फीचर उपलब्ध असणार आहे. त्यामुळे युजर्स 'Hey Google' सोबत 'Whatsapp Video ( कॉल करायचा आहे त्या कॉन्टॅक्टचं नाव)' सांगून लवकरच व्हिडीओ कॉल करू शकणार आहेत. 

 आता लवकरच युजर्स असिस्टेंटच्या मदतीने व्हॉट्सअ‍ॅपवरून फ्री ऑडिओ आणि व्हिडीओ कॉल करू शकतात. त्यासाठी फक्त गुगल व्हॉट्सअ‍ॅप व्हिडीओसोबत कॉन्टॅक्टचं नाव सांगायचं आहे. हे फीचर फक्त अँड्रॉईडसाठी रोलआऊट करण्यात आले आहे. आयफोन्ससाठी हे फीचर अद्याप देण्यात आलेले नाही.

गुगल असिस्टेंटचे प्रोडक्ट मॅनेजर क्रिस यांनी दिलेल्या माहितीनुसार, असिस्टेंट सुरुवातीपासूनच लोकप्रिय मेसेजिंग सर्व्हिससोबत काम करतं. त्यामुळे युजर्स मेसेज पाठवू शकतात तसेच वाचू शकतात.

व्हॉट्सअ‍ॅपच्या बीटा व्हर्जन  2.19.221 मध्ये हे नवीन फिंगरप्रिंट लॅाकची सुविधा उपलब्ध असणार आहे. तसेच हे व्हर्जन उपलब्ध झाल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप सेटिंगच्या प्रायव्हसीमध्ये जाऊन 'ऑथेंटिकेशन' चे नवीन ऑप्शन उपलब्ध होईल. यानंतर युजर्स आपले फिंगर प्रिंट रजिस्टर करू शकणार आहे.व्हॉट्सअ‍ॅप कंपनी युजर्सला आकर्षित करण्यासाठी नेहमीच नवनवीन फीचर्स घेऊन येते. त्यातच आता व्हॉट्सअ‍ॅप बीटामध्ये  फिंगरप्रिंट लॉक हे फीचर्स वापरता येणार आहे. त्यामुळे हे नवीन फीचर्स सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे ठरणार आहे. या संबंधीत माहिती WABetaInfoने ट्विट करत दिली आहे. 

 - व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या फ्रीक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स (FAQ) पेजवर याबाबत माहिती दिली आहे. यामध्ये हे दोन्ही अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपचे ऑफिशिअल व्हर्जन नसल्याचं सांगण्यात आलं आहे. 

- व्हॉट्सअ‍ॅपच्या काही अटी आणि नियम पाळले नाहीत तर काही वेळ युजर्सना ब्लॉक केलं जाऊ शकतं. 

- व्हॉट्सअ‍ॅपचे थर्ड पार्टी अ‍ॅप GB WhatsApp आणि WhatsApp Plus चा वापर केल्यास व्हॉट्सअ‍ॅप युजर्सना टेम्पररी बॅन करतं. 

- युजर्स या दोन्ही अ‍ॅपपैकी कोणत्या अ‍ॅपचा वापर करत असतील तर त्यांनी वेळीच सावध होणं गरजेचं आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या नियमांमध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे.

- थर्ड पार्टी अ‍ॅप असून ते व्हॉट्सअ‍ॅपच्या अनेक नियमांचं उल्लंघन करतात. त्यामुळेच व्हॉट्सअ‍ॅप यांचा वापर करणाऱ्या युजर्सना टेम्पररी ब्लॉक करतं. 

- जर कोणत्याही युजरला अ‍ॅपमध्ये ‘Temporarily banned’ असा मेसेज आला तर युजर्स ऑफिशिअल व्हॉट्सअ‍ॅप ऐवजी अनसपोर्टेड व्हर्जनचा वापर करत आहेत. 


Web Title: whatsapp user can now make video call directly by giving command to google assistant
 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com