उर्मिला केंव्हा आमदार होणार?

उर्मिला केंव्हा आमदार होणार?
urmila matondkar

मुंबई - ती आली तिने पाहिल आणि तिनं जिंकूण घेतलं.  हो हे वाक्य अभिनेत्री Actress  उर्मिला मातोंडकर urmila matondkar वर चोक बसतं कारण जेव्हा तिने सिनेमात Movie काम केलं तेव्हा ही तिनं लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवल आणि जेव्हा ती राजकारणात आली तेव्हा ही उर्मिलाने लोकांना आपली दखल घेण्यासाठी प्रेरीत केलं.  When will Urmila become an MLA

२०१९च्या लोकसभा निवडणूकांच्या काही दिवस आगोदर एक दिवस आला जेव्हा उर्मिला मातोंडकरचा काँग्रेस Congress पार्टीमध्ये प्रवेश झाला आणि मग काय संपूर्ण भारताला आश्चर्याचा धक्का बसला.

हे देखील पहा -

खर तर उर्मिलाच्या घरात समाज सेवा आणि त्याचे संस्कार होतेच. मात्र लोकांना तो पर्यंत तिच्या या प्रवेशाचे गांभीर्य घेतले नव्हते. मात्र ज्या दिवशी उर्मिलाने उत्तर मुंबई या मतदार संघातून भाजप खासदार गोपाळ शेट्टी Gopal Shetty यांच्या विरोधात निवडणुकीच्या प्रचाराला सुरवात केली तेव्हा सगळ्यांच लक्ष तिने तिच्या बोलण्याकडे आणि ठाम मुद्दयांवर वेधून घेतलं. When will Urmila become an MLA

उर्मिलाला या निवडणुकीत यश मिळालं नाही मात्र एक व्यक्ती एक समाज सेवक आणि एक महिला नेता म्हणून तिने संपूर्ण भारतात आपली एक वेगळी छाप पाडली. निवडणूका झाल्या पण या नंतर उर्मिलाने काँग्रेसला रामराम करत शिवसेनेत Shivsena प्रवेश केला. राजपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीत ही उर्मिला मातोंडकर हीचं नाव आहे.

खरचं उर्मिलाने सिनेमात ही प्रत्येक वेळा वेगळ्या भूमिका साकारल्या आणि तिच्या सिनेमातल्या प्रत्येक व्यक्तिरेखांवर लोकांनी भरभरून प्रेम ही केलं. त्यामुळे आता तिच्या चाहत्यांचे लक्ष लागले उर्मिला मातोंडकर हीच्या या नव्या प्रवासाकडे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com