WTC Final: तिसरा वेगवान गोलंदाज कोण?; विराटची चिंता वाढली

WTC Final: तिसरा वेगवान गोलंदाज कोण?; विराटची चिंता वाढली
mohmad siraj

१८ ते २२ जून या कालावधीत होणाऱ्या विश्व अजिंक्यपद कसोटीच्या (WTC Final) अंतिम सामन्याबाबत भारतीय वेगवान गोलंदाजांबद्दल सर्वत्र चर्चा सुरु आहे. ते तीन वेगवेग गोलंदाज कोण असतील त्याबाबत चर्चा सुरु झाली आहे. त्यामध्ये लोकांमधून दोन गोलंदाजांची नावं समोर येत आहेत. परंतु, एका गोलंदाजाबद्दल अजून निश्चितता होत नाहीये. मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) किंवा इशांत शर्मा (Ishant Sharma) दोघांपैकी कोण संघात असणार याबाबत उत्सुकता वाढत आहे. त्याच वेळी सूत्रांकडून आलेला माहितीनुसार तिसरा गोलंदाज कोण असेल याबाबत निवड समितीमध्ये मनोमिलन होत नाहीये.

हे देखील पाहा

संघ व्यवस्थापकांमध्ये काहीचं म्हणणं आहे इशांत शर्माला खेळवला पाहिजे तर काही जन मोहमद सिराजच्या नावाचा विचार करत आहेत. मोहमद सिराज आयपीएलमध्ये कर्णधार कोहलीच्या आरसीबी संघात खेळत आहे. सोशियल मीडियावरती याबात तुफान चर्चा सुरु आहे. लोकांमधून तर इशांत शर्मा पेक्षा सिराजच्या नावाला जास्त पसंती मिळत आहे.  (Who will be the third fastest bowler Virat anxiety increased)

जसप्रीत बुमराह आणि मोहंमद शमी हे संघातील प्रमुख गोलंदाज असल्याने त्याचं खेळणं जवळपास निश्चित आहे. त्यामुळे संघातील तिसरा गोलंदाज कोण असेल याबाबत चर्चा सुरु आहे. संघ व्यवस्थापकांनाही याबाबत निर्णय घेणं अवघड जाणार आहे.  इशांत शर्माने आपल्या गोलंदाजीमध्ये सुधारणा केली आहे. त्याचबरोबर, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर सिराज एक उमदा गोलंदाज म्हणून समोर आला आहे. कर्णधार विराट कोहली आणि व्यवस्थापकांना एकाची निवड कारण मोठं कोडं आहे. 

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com