एकटे आमदार नव्हे संपूर्ण कुटुंब करतंय कोरोना रुग्णांची सेवा

एकटे आमदार नव्हे संपूर्ण कुटुंब करतंय कोरोना रुग्णांची सेवा
Koregaon

सातारा : कोरेगाव Koregaon विधानसभा मतदार संघाचे आमदार MLA महेश शिंदे Mahesh Shinde कोरोनाच्या Corona पहिल्या लाटे पासून आत्तापर्यंत जनसेवेस्तव अविरतपणे कार्यरत Serving आहेत. स्वतःच्या खर्चाने महेश शिंदे यांनी कोरेगाव मतदार संघात वेगवेगळ्या ठिकाणी जवळ जवळ 325 बेडची व्यवस्था असणारी रुग्णालये उभारली आहेत.Whole MLA Family Serves Corona Patients

या रुग्णालयात ऑक्सिजन बेड ची संख्या जास्त असल्याने या भागातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. महेश शिंदे यांनी फक्त सेंटर उभी केली नाहीत तर ते अहोरात्र  स्वतः आणि कुटुंबाच्या Family सोबत  With रुग्णांना Patient सेवा देत असतात.

हे देखील पहा -

महेश शिंदेंच्या पत्नी आणि बहीण या सुद्धा डॉक्टर असल्याने त्यांनी सुद्धा पूर्ण वेळ रुग्णांच्या सेवेसाठी वाहून घेतले आहे.शासनाच्या कोणत्याही योजनांची वाट न पाहता केवळ या लाटेला थोपवण्यासाठी महेश शिंदेंनी स्वतःच्या खर्चाने हे सर्व उभे केले आहे.Whole MLA Family Serves Corona Patients

आमदार म्हणलं की केवळ मत मागायला येणार किंवा आश्वासनाची खैरात करणार असा एक समज लोकांच्या मध्ये असतो परंतु महेश शिंदेंनी या सगळ्यांना फाटा देत रुग्णांच्यात जाऊन सुरू केलेल्या या सेवेमुळे कोरेगाव च्या जनतेला त्यांच्या रूपाने एक  देवदूत भेटल्याची भावना आहे. 

शासकीय यंत्रणेवर येणारा ताण काही अंशी या भागातून कमी झाला आहे. महेश शिंदेंनी केवळ ही सेंटर उभी केली असून यामध्ये लागणारा सगळा हॉस्पिटल चा स्टाफ सुद्धा स्वतःच्या खर्चाने टिकवून ठेवला आहे. या ठिकाणी रुग्णांना अलोपॅथी,होमियोपॅथी आणि आयुर्वेदिक अशा तिन्ही प्रकारे उपचार दिले जात असल्याने येथून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील मोठे आहे. Whole MLA Family Serves Corona Patients

गेल्या वर्षी काडसिद्धेश्वर कोरोना केअर सेंटर मधून जवळपास 1450 रुग्ण बरे केले होते. मुख्य म्हणजे कोरेगाव मतदार संघात कोरोना बाधित असणाऱ्या लोकांना ज्यांना अन्नाची गरज आहे त्यांना मोफत जेवण दिले जात आहे. तसेच या कोव्हिड सेंटर मधील रुग्णांना सुद्धा जेवण मोफत दिले जाते.

ज्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे अशा सर्व रुग्णांना औषधे सुद्धा मोफत दिली जात आहेत. महेश शिंदेंनी सुरू केलेली ही सेवा जेव्हा लोकांना समजली तेव्हा पासून अनेक दानशूर व्यक्ती पुढे येऊ लागल्या आहेत आणि त्यामुळे त्याचा फायदा रुग्णांना होताना पाहायला मिळत आहे.

Edited By : Krushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com