इतरांचे आरक्षण कायम ठेऊन मराठ्यांना आरक्षण देणार - अजित पवार

इतरांचे आरक्षण कायम ठेऊन मराठ्यांना आरक्षण देणार - अजित पवार
अजित पवार.jpg

वृत्तसंस्था : सर्वोच्च न्यायालयाने Supreme Court  फटकारलेल्या # मराठ्यांना आरक्षण #Maratha Reservation देण्यासाठी महाराष्ट्र सरकार State Government,  सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. इतर समाजातील आरक्षणाला हात न लावता,  मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहोत, मात्र सध्या आम्ही  कोरोनाचा संसर्ग कमी करण्याकडे लक्ष देत आहोत.  अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा आरक्षणाबाबत आपली बाजू मांडली आहे. (Will give reservation to Marathas by maintaining reservation of others - Ajit Pawar) 

पुण्यात आयोजित एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी भाजपावरही निशाणा साधला. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यापासून राज्य सरकारवर अनेक स्तरावरून टीका होताना दिसत आहे.  तर आज शिवराज्याभिषेक दिनानिमित्तही छत्रपती संभाजी राजे यांनीदेखील मराठा समाजाला Maratha Community आरक्षण Reservation मिळण्यासाठी येत्या १६ जूनपासून आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. 

या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. “हेच मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकलं असतं, तर ते म्हटले असते, आम्हीच कायदा केला होता. आम्ही असं केलं, तसं केलं म्हणाले असते,  याचाच मला राग येतो. पण इतर समाजातील कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता  मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. यासाठी काल राज्यपालांची भेट घेतली. आता वरिष्ठांनाही भेटणार आहे.  त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने ज्या गोष्टी ग्राह्य धरल्या होत्या, त्यांचा पुनः एकदा सखोल विचारविनिमय  केला जाईल. सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले आणि सदस्यांची मतं मागवली जात असून त्या दृष्टीने मार्ग काढत असल्याचंही यावेळी अजित पवार यांनी सांगितले. 

सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय लक्षात घेणे जरुरीचे आहे, पान  मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन  समाजाला भडकविण्याचा प्रयत्न  हॉट असल्याचे दिसत आहे. पण 'आजच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ग्वाही देतो, की इतर समाजातील  कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली आहे.

तसेच, मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्य सरकारवर टीका करणाऱ्या नरेंद्र पाटील यांनाही उत्तर दिले आहे.  “भावनेच्या आहारी जाऊन काही काहीजण काहीही बोलत असतात.  कायदा, संविधान  यांचं काहीही विचार न केल्यामुळे त्यांच्या बातम्या चालून जातात.  पण त्यांचा आवाका आम्हाला माहिती आहे. त्यामुळे आम्ही त्याला  फार महत्त्व देत नाही, '' असेही त्यांनी म्हटले आहे. 
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com