पोलिसांच्या कानशिलात वाजवली; महिला आमदाराची दादागिरी

पोलिसांच्या कानशिलात वाजवली; महिला आमदाराची दादागिरी
The woman MLA played in the ear of the police 

जयपूर : एका महिला आमदाराने MLA हेड कॉन्स्टेबलला मारहाण केल्याचा आरोप झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या पोलीस Police कॉन्स्टेबलने आमदाराच्या भाच्याची गाडी थांबवून, त्याला दंड fine केल्याचे समोर आले. या कारणामुळे राग ताब्यात न ठेवता महिला आमदाराने पोलीस कॉन्स्टेबलला चापट मारली आहे. याप्रकरणी पोलिसांनी महिला आमदारावर गुन्हा दाखल केल आहे. woman MLA  slaps police constable

हे प्रकरण राजस्थानच्या Rajasthan बांसवाडा banswara जिल्ह्यातील कुशलगड Kushalgarh या गावामध्ये घडली आहे. या ठिकाणील अपक्ष महिला आमदार रमिला खरिया यांच्या भाच्याला अडवून दंड ठोठावल्याचा इतका राग आला की, त्यांनी पोलीस कॉन्स्टेबललाच चापट मारली आहे. या हेड कॉन्स्टेबलचे नाव महेंद्र नाथ सिंह असे असून त्यांनी महिला आमदाराविरोधात, गुन्हा दाखल केला आहे.

हेड पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र नाथ यांनी सांगितले, की नाकाबंदी असल्याने दुचाकीवरुन जात असलेल्या सुनील बारिया याला पोलिसांनी अडवले होते. कोरोनामुळे Corona सर्व ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. येणाऱ्या- जाणाऱ्या लोकांची चौकशी केली जात होती. woman MLA  slaps police constable 

मात्र, पोलिसांनी दुचाकी थांबवताच सुनीलला राग आल आणि तो पोलिसांची कॉलर पकडून त्यांना नोकरी वरुन काढण्याची धमकी देऊ लागला. यामुळे हेड पोलीस कॉन्स्टेबलनं त्याला दंड ठोठावला होता. याची तक्रार सुनीलने आमदार रमिला यांच्याकडे केली. यानंतर महिला आमदाराने कॉन्स्टेबलला चापट लगावली आहे.

हे देखील पहा 

या प्रकरणी महेंद्र नाथ यांनी आमदारावर गुन्हा नोंदवण्याविषयी सांगितले असता, स्टेशन प्रभारी प्रदीप कुमार यांनी त्यांना महिला आमदाराची माफी मागण्यास सांगितले आहे. यावर महेंद्र यांनी नकार दिल्यानंतर इतर पोलीस महेंद्रच्या बाजूने उभे राहिले आणि संपावर गेले.  तसेच त्यांनी जेवण करण्यास नकार दिला. अखेर पोलिसांनी आमदाराविरोधात गुन्हा दाखल करून घेतल. त्यातच महेंद्र नाथ विरोधातही केस दाखल करण्यात आली आहे. कारण आमदाराविरोधात तक्रारीचा तपास सीबीसीआयडी करत आहे, यामुळे हे प्रकरण सीबीसीआयडीकडे CBCID सोपवण्यात आले आहे. 

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com