महिला मुख्याधिकाऱ्यांनीच हाती घेतला अतिक्रमण तोडण्यासाठी हातोडा...

महिला मुख्याधिकाऱ्यांनीच हाती घेतला अतिक्रमण तोडण्यासाठी हातोडा...
Women CEO of Bhandara Initiated Action Against Illegal Constructions

भंडारा : जिल्ह्याच्या साकोली Sakoli नगरपालिकेच्या मुख्याधिकारी माधुरी मडावी यांचे रौद्र रूप पहायला मिळाले असून अतिक्रमण Encrochment काढायला अतिक्रमण Illegal Construction धारकाने मनाई केल्याने मुख्याधिकारी यांनी स्वतः हातात हातोडा घेऊन अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न केला. Women CEO of Bhandara Initiated Action Against Illegal Constructions

त्यामुळे अतिक्रमणधारक आणि  मुख्याधिकार्‍यांमध्ये प्रचंड वादंग होऊन परिस्थिती हाताबाहेर जाते की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र तेवढ्यात माझी आमदार MLA बाळा काशिवार हे घटनास्थळी आल्याने आणि मध्यस्थीची भूमिका बजावल्याने हा वाद बऱ्याच वेळा नंतर शांत झाला.

हे देखिल पहा

आपल्या उत्कृष्ट कामासाठी ओळखल्या जात असलेल्या माधुरी मडावी या साकोली च्या मुख्याधिकारी झाल्यापासून या ना त्या कारणाने चर्चेत होत्या.  काही महिन्यापूर्वी त्यांचे स्थानांतरण  झाले होते,दरम्यान मॅट मध्ये जाऊन त्यांनी प्रक्रियेवर स्थागनादेश मिळवला असल्याने आठवढ्यापुर्वीच त्या साकोली येथे मुख्याधिकारी म्हणून पुन्हा रुजू  झाल्या.ॉ

19 मे रोजी त्यांनी नगरसेविका अनिता हरीश पोगडे यांना त्यांनी केलेले अतिक्रमण 24 तासात काढण्यासंदर्भात नोटीस बजावली, अतिक्रमण न काढल्यास यंत्राद्वारे काढण्यात येईल असे नोटिशीत स्पष्ट करण्यात आले होते. दरम्यान काल पंधरा ते वीस जणांचा ताफा घेऊन मुख्याधिकारी पोगडे यांच्या घरी पोहचल्या, मात्र अतिक्रमण तोडण्यास विरोध सुरू झाल्याने अतिक्रमण विरोधी पथक नागरिकांच्या भीतीमुळे पुढे येत नव्हते. Women CEO of Bhandara Initiated Action Against Illegal Constructions

तेव्हा मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी स्वतः मोठा घण हातात घेत अतिक्रमण तोडण्यास सुरुवात केली. एका मुख्य अधिकाऱ्याकडून स्वतःहून अतिक्रमण काढण्याचा हा प्रकार पाहून तेथे जमलेल्या लोकांनी आश्चर्य व्यक्त केलं. यावेळी झालेल्या शाब्दिक भांडणांमध्ये मुख्याधिकारी यांचे रौद्र रूप पाहायला मिळालं. त्यामुळे अतिक्रमण धारक आणि अधिकारी यांच्यातला हा वाद साकोली मध्ये चर्चेचा विषय बनला आहे.

Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com