World Blood Donor Day - रक्तदान केल्यानं शरीराला होतात हे फायदे

World Blood Donor Day - रक्तदान केल्यानं शरीराला होतात हे फायदे
World Blood Donor Day

World Blood Donor Day - रक्तदान करणे म्हणजे  एखाद्या व्यक्तीने स्वेच्छेने अंगातून रक्त काढून देण्याची क्रिया होय. रक्तदान करणे हे शरीरसाठी लाभदायी असते. तरीसुद्धा अनेकांना  रक्तदान करण्याची भीती वाटत असते. रक्तदान करावे की नाही असा संभ्रम अनेकांच्या मनात सुरू असते. World Blood Donor Day - Benefits of Donating Blood

तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार रक्तदान केल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहते. तसेच वजन देखील नियंत्रणात राहते.  एवढेच नव्हे तर रक्तदान करणाऱ्या व्यक्तीच्या मनावर आणि शरीरावर सकारात्मक परिणाम होतात. म्हणून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी 14 जूनला जागतिक रक्तदान दिन साजरा केला जातो. 18 ते 60 या वयोगटातील कोणतीही व्यक्ति रक्तदान करू शकते. फक्त तो व्यक्ति निरोगी असणे गरजेचे असते. परंतु मासिक पाळीमध्ये , गर्भावती महिला , रक्तदान करू शकत नाही. 

हे देखील पहा - 

1) हृद्यासाठी लाभदायी - 

रक्तदान करणे शरीरसाठी खूप लाभदायी आहे. त्यामुळे स्ट्रोकचा धोका कमी होतो. रक्तात आयरनचे प्रमाण अधिक झाल्यास हृदयरोगाचा ढहोका निर्माण होऊ शकतो. 
म्हणूनच नियमित रक्तदान केल्याने आयरनच प्रमाण नियंत्रणात राहते. 

2) लाल रक्त पेशींचे उत्पादन- 

रक्तदान केल्यानंतर शरीरात नवीन रक्त तयार होते. त्यामुळे शरीरातील पेशी लाल रक्ताच्या पेशी निर्माण करण्यासाठी मदत होते. परिणामी आरोग्य चांगले राहून शरीराला फायदा होतो. 

3) वजन नियंत्रणात राहते -

रक्तदान केल्याने शरीरातील कॅलरीज कमी होतात. लाल रक्तपेशींचा स्तर काही महिन्यात नियंत्रणात  येतो. त्यामुळे वजन नियंत्रणात राहते. फक्त योग्य आहार आणि व्यायाम असायला हवा. 

4) कॅन्सरचा धोका कमी -

नियमित रक्तदान केल्याने शरीरातील आयरनचे अधिक प्रमाण होण्यापासून रोखता येते. यामुळे कॅन्सरचा धोका कमी होण्यास मदत मिळते . तसेच रक्तदानामुळे तुम्ही अॅक्टिव राहता. 

5) तपासणी करण्यात येते - 

रक्तदान करण्यापूर्वी तुमचे रक्त आणि आरोग्याची तपासणी केली जाते. रक्तातील हिमोग्लोंबिनची पातळी तपासली जाते. रक्त तपसणी केल्याने एखादी व्यक्ति रक्तदान करण्यास सक्षम आहे की नाही , याची माहिती मिळते. यामुळे नियमितपने रक्तदान केल्याने स्वतःच्या आरोग्याची योग्यरीतीने काळजी करू शकतो. रक्तदान केल्यानंतर 21 दिवसानंतर शरीरात नवीन रक्त तयार होण्यास सुरुवात होते. 

Edited By - Puja bonkile 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com