World Cup 1999: हर्षल गिब्जचा एक झेल पडला होता महागात; पाहा VIDEO 

World Cup 1999: हर्षल गिब्जचा एक झेल पडला होता महागात; पाहा VIDEO 
Saam Banner Template

एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात (ODI Cricket) असे अनेक झेल सोडले गेले आहेत, ज्याची किंमत समोरच्या संघाला खूप महाग पडली होती.  परंतु, एक असा झेल होता जो अगदी सोपा होता. परंतु,  त्या झेलला सर्वात महाग झेल म्हणालं, तर काही चुकीचं ठरणार नाही. तर झालं असं दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रिलया यांच्यात 1999 च्या (World Cup 1999) विश्वचषकाचा उपांत्यपूर्व सामना सुरु होता. त्या सामन्यात आफ्रिकेच्या हर्षल गिब्जने (Harshal Gibbs) शॉर्ट मिडविकेटवर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह वॉ (Steve Waugh) चा झेल सोडला होता. हा झेल सोडल्यानंतर स्टीव्ह म्हणाला की आफ्रिकेने फक्त झेल नाही सोडला तर पूर्ण विश्वचषक हातातून गमावला.

पाहा व्हिडिओ

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळविण्यात आलेल्या 1999 विश्वचषकातील हा 13 जूनचा सामना होता. विजयी संघाला उपांत्य फेरीचे तिकीट मिळणार होते. हर्शल गिब्जकडून 111 धावा केल्यामुळे दक्षिण आफ्रिकेने 7 षटकांत 271 धावा केल्या होत्या. डर्नल कुलीननेही 50 धावा केल्या होत्या.(World Cup 1999 A catch by Herschelle Gibbs was costly)

लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 11 षटकांत 3 बाद 48 होती. त्यानंतर 21 षटकानंतरही ३ विकेटच्या साहाय्याने 68 धावा होत्या. कर्णधार स्टीव्ह वॉ खेळपट्टीवर होता आणि तो अवघ्या 11 धावांवर खेळात होता.  तेव्हा गिब्सने स्टीव्ह वाॅ चा सोपा झेल सोडला आणि येथून पुढे स्टीव्ह वॉ ने 110 चेंडूत नाबाद 120 धावांची खेळी करुन ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. जेव्हा गिब्सने झेल सोडला तेव्हा वॉ म्हणाला, "तू झेल नाही तर विश्वचषक गमावला". स्टीव्ह वॉ ने 120 धावांच्या नाबाद खेळीसह आपले वाक्य सिद्ध करुण दाखवले. दक्षिण आफ्रिकेने त्यावेळी सामना आणि विश्वचषक दोन्ही गमावले.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com