शिराळ्यात सापडले जगातील सर्वात  दुर्मिळ फुलपाखरू 

शिराळ्यात सापडले जगातील सर्वात  दुर्मिळ फुलपाखरू 
shirala butterfly.jpg

सांगली :  भागातील शिराळा तालुक्यातील कोकरुड येथे जगातील सर्वात मोठ्या पतंगापैकी एक असलेले "एट्याकस एॅटलास मोथ"(Attacus Atlas Moth) हे दुर्मीळ आणि आकर्षक फुलपाखरू  सापडले आहे. आशिया खंडातील जंगलात आढळणाऱ्या स्थानिक प्रजातींपैकी एक असलेले हे फुलपाखरू कोकरुड येथील  आनंदा घोडे यांच्या राहत्या घरी दोरीवरती वाळत घातलेल्या कपड्यावरती  विसावले होते... या फुलपाखराच्या प्रजातीस "पतंग" फुलपाखरू म्हणून संबोधले जाते. (The world's rarest butterfly found in Shirala) 

लक्षवेधक व रंगीबेरंगी असलेल्या फुलपाखराच्या पंखात दोन्ही बाजूला आकर्षक असलेली नक्षीने आणि रंगानी घरातील सद्यस्यांचे आणि शेजारच्या लोकांचे लक्ष वेधले...  सर्वांनी कुतूहलाने त्याचे फोटोही काढले... नंतर याविषयी घरातील कु. प्रियांका घोडे  हिने गुगल वर या प्रजातीबद्दल माहिती शोधली असता ते  दुर्मिळ आणि जगातील सर्वात मोठ्या पतंगापैकी एक असलेले " "एट्याकस एॅटलास मोथ" असलेचे समजले...

जगातील सर्वात मोठ्या पतंगांमध्ये " एट्याकस एॅटलास मोथ" या जातीच्या फुलपाखराची गणती होते. त्याचा रंग आकर्षक  लालसर-तपकिरी व किंचित सिल्की असतो.  त्याच्या पंखांवर नकाशाप्रमाणे मोठे पांढरे ठिपके असतात. त्यामुळेच त्याला "एट्याकस एॅटलास मोथ" म्हणतात.  याचे खास वैशिष्ट्य म्हणजे याला तोंड किंवा पचनसंस्था नसते.  सुरवंट (आळी) असतांनाच भरपूर खाऊन घेतलेले असते.  या पतंगाचे आयुष्य जेमतेम पाच ते साथ दिवस किंवा एक ते दोन आठवडे असते. मादी शरीरातून एक प्रकारचा रासायनिक द्रव्य सोडते. याचा वास कित्येक किलोमीटर दूर जाऊन, नर आणि मादीचे मिलन झाल्यावर अंडी देऊन मादी मरण पावते. अशा नैसर्गिक आश्चर्याने भरलेला हा दुर्मिळ जिव शक्यतो दक्षिण-पूर्व आशियात आढळतो.

फुलपाखरांची ऍटलस ही जात आशिया खंडातील जंगलात आढळणारी स्थानिक प्रजाती आहे. आठ इंच लांबीचे हे फुलपाखरू सुमारे २०० अंडी घालते. तर  २७ से.मी. पर्यन्त पंख पसरू शकते. ही प्रजाती नष्ट होत चालली असून महाराष्ट्रात हे फुलपाखरू भीमाशंकरच्या जंगलात आढळून आलेचे सांगितले जाते. हे फुलपाखरू पतंग प्रवर्गातील असून अतिशय सुंदर व देखणे फुलपाखरू म्हणून याची जगात ओळख आहे. 

Edited By - Anuradha Dhawde 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com