WTC Final: BCCI ने पाठिंबा देण्याचे केले आवाहन; पाहा VIDEO

WTC Final: BCCI ने पाठिंबा देण्याचे केले आवाहन; पाहा VIDEO
Saam Banner Template

नवी दिल्ली: न्यूझीलंड विरुद्ध (IND vs NZ) 18 जूनपासून साऊथहॅम्पन येथे सुरू होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपदासाठी अंतिम सामन्याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. टीम विराट (Team Virat) आणि भारतासाठी ही मेगाफायनल खूप महत्वाची आहे. भारतीय संघाने गुरुवारीपासून नेटचा सराव सुरू केला आहे. (For WTC Final BCCI appeals for support)

भारतीय संघ बऱ्याच दिवसानंतर मैदानात उतरणार आहे. त्यामुळे बीसीसीआयने चाहत्यांना सामन्यासाठी तयारी करावी व टीम इंडियाला पाठिंबा द्यावा अशी विनंती केली आहे. बीसीसीआयने ट्विटरवर लिहिले की, 'आता सामन्यासाठी काउंटडाउन एका आठवड्याचा राहिला आहे. टीम इंडियाला सपोर्ट करा. टीम #WTC2021Final साठी न्यूझीलंडशी दोन हात करण्यास सज्ज आहे''.

या मोठ्या अंतिम सामन्यासाठी विराट आणि संघाची तयारी जोरात सुरू आहे आणि सर्व खेळाडू मेगा फायनलबाबत खूपच गंभीर आहेत. बीसीसीआयने गुरुवारीपासून संघाच्या सरावाचे व्हिडिओ अधिकृत ट्विटर खात्यावर टाकण्यास सुरुवात केली आहे. व्हिडिओमध्ये संघ सर्व प्रकारचा सराव करताना दिसत आहे आणि खेळाडू मैदानात मोठ्या प्रमाणात घाम गाळताना दिसत आहेत. न्यूझीलंड इंग्लंडविरुद्ध सामने खेळून भारतीय संघाविरुद्ध मैदानात उतरणार आहे. 

अशा परिस्थितीत भारतीय खेळाडू सरावात कसलीच कसर सोडत नाही आहेत. बीसीसीआयने ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'प्रशिक्षणासाठी हा आमचा पहिला गट होता आणि त्याचा उत्साह खूप जास्त होता. भारतीय संघाची अंतिम सामन्यांची तयारी जोरात सुरू आहे''.

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com