लाचखाेर सहायक पोलिस निरीक्षक गणेश मुंढेवर गुन्हा दाखल

लाचखाेर सहायक पोलिस निरीक्षक गणेश मुंढेवर गुन्हा दाखल
bribe

- कैलास चाैधरी

उस्मानाबाद : निनावी अर्जावरील तक्रारीची कारवाई टाळण्यासाठी ७० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या येरमाळा पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक गणेश मुंढे आणि पोलिस पाटील असलेल्या एकाविरुध्द लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (ता.१३) कारवाई केली. yermala-police-station-ganesh-mundhe-trapped-by-acb-marathi-news-sml80

तक्रारदार यांच्या विरुद्ध आलेल्या निनावी अर्जावर कारवाई न करण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक गणेश मुंढे याने रत्नापूर येथील पोलिस पाटील सुशन जाधवर याच्या माध्यमातून २१ आॅगस्टला एक लाख रुपये मागितले.

bribe
किल्ले प्रतापगडवरुन उदयनराजेंचे बंधू शिवेंद्रराजेंना आव्हान

इतक्या माेठ्या प्रमाणात लाचेची मागणी झाल्याने तक्रारदाराने तडजोडी नंतर ७० हजार देऊ केले. त्यानंतर तक्रादाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी (एसीबी) संपर्क साधून मुंढे याच्या विराेधात तक्रार केली. एसीबीने मुंढे याच्यावर सापळा रचला. त्याने लाच bribe स्वीकारल्याचे पंचासमक्ष मान्य केले.

दरम्यान मुंढे याच्या लाचेची मागणीची पडताळणीनंतर बुधवारी त्याच्या विरुद्ध येरमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे अशी माहिती उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com