तुम्ही ३१ डिसेंबरपूर्वी ही चार कामे नक्की  करा 

तुम्ही ३१ डिसेंबरपूर्वी ही चार कामे नक्की  करा 


जर तुमचे स्टेट बँकेत खाते असेल आणि तुम्ही बँकेचे जुने एटीएम कार्ड वापरत असाल तर तुमच्याकडे जुने मॅग्नेटिक कार्ड असेल तर लगेचच तुमच्या शाखेत जाऊन ते बदलून घ्या. ३१ डिसेंबर २०१९ नंतर जुन्या एटीएम कार्डच्या साह्याने एटीएममधून पैसे काढता येणार नाहीत. त्यामुळे नवे कार्ड घेणे आवश्यक आहे.

जर तुम्ही गत आर्थिक वर्षातील म्हणजेच २०१८-१९ मधील प्राप्तिकर विवरण पत्र भरले नसेल तर पुढील मोठा दंड टाळण्यासाठी तुम्ही ३१ डिसेंबरपूर्वी प्राप्तिकर विवरण पत्र भरू शकता. ३१ डिसेंबर २०१९ पूर्वी प्राप्तिकर विवरण पत्र भरल्यास ५००० रुपये दंड द्यावा लागेल. पण त्यानंतर ३१ डिसेंबर २०२० पर्यंत प्राप्तिकर विवरण पत्र भरले तर १०,००० दंड भरावा लागेल.


आपले पॅनकार्ड आधारकार्डशी जोडण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०१९ आहे. याआधी सातत्याने ही अंतिम तारीख केंद्र सरकारकडून वाढविण्यात आली. प्राप्तिकराच्या सर्व सेवा व्यवस्थित मिळविण्यासाठी लवकरात लवकर आपले पॅनकार्ड आधारकार्डशी जोडून घ्या, अशी सूचना प्राप्तिकर विभागाने केली आहे. पॅनकार्ड आधारकार्डला जोडणे ऐच्छिक नसून अनिवार्य आहे हे लक्षात ठेवले पाहिजे.


जर तुम्हाला सर्व्हिस टॅक्स किंवा एक्साईज ड्युटी संदर्भात कोणतीही तक्रार लवादाकडे नोंदवायची असेल तर ती ३१ डिसेंबरच्या आता नोंदवा. या संदर्भात एक नवी योजना अर्थ मंत्रालयाने सुरू केली असून, त्यासाठी नोंदणी करण्याची मुदत ३१ डिसेंबर २०१९ आहे.


Web Title:You must do these four tasks before December 31

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com