मुलुंडमध्ये पॉश सोसायटीनं केली वीजचोरी, रक्कम ऐकून थक्क व्हाल

मुलुंडमध्ये पॉश सोसायटीनं केली वीजचोरी, रक्कम ऐकून थक्क व्हाल
mulund

मुलुंडच्या एका पॉश सोसायटीमध्ये तब्बल 63.23 लाखाची वीजचोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गेल्या दोन वर्षापासून निर्मल लाईफ स्टाईलच्या झिरकोन को.ऑफ.हाउसिंग सोसायटीचे  बांधकाम सुरू आहे. या बांधकामांसाठी लागणारी वीज Bmc च्या आऊट गोइंग स्विचला केबल जोडून गेल्या 2 वर्षा पासून वीज चोरी करत असल्याचा संशय महावितरणच्य अधिकाऱ्यांना आल्यानंतर या निर्मल लाईफ स्टाईल आणि झिरकोन को.ऑफ. हाउसिंग सोसायटीवर आता कारवाई करत मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे करण्यात आला आहे.(You will be shocked to hear about the power theft committed by Society in Mulund)

हे देखील पाहा

ही घटना समोर आल्यामुळं आता वीज चोरट्यांचे धाबे दणाणले आहेत. सदर, कारवाई महावितरण मुलुंडचे कार्यकारी अभियंता दत्तात्रेय भणगे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वोदय उपविभागातील उप कार्यकारी अभियंता शकील पाटील, सहायक अभियंता  प्रशांत भानुशाली व त्यांच्या चमूतील सतीश कुलकर्णी, राजू हुलहुले, श्रीराम कोरडे, जयश्री त्रिंबके, सुनील निंबाळकर यांनी केली. मुलुंडच्या निर्मल लाईफ स्टाईलच्या झिरकोन को.ऑफ.हाउसिंग सोसायटीचे बांधकाम सुरू आहे.
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com