तुमचं अकाऊंट SBI मध्ये आहे का ?  

तुमचं  अकाऊंट SBI मध्ये आहे का ?  

स्टेट बँक ऑफ इंडिया दरवर्षी आपल्या ग्राहकांसाठी काही सुविधा मोफत तर काही सुविधा अगदी कमी शुल्क आकारून ग्राहकांना देत असते.  पण काही सेवा   रुपे एटीएम कम डेबिट कार्ड या खात्यावर मोफत देण्यात येणार आहे. याशिवाय खात्यावर कोणतंही वार्षिक शुल्क आकारण्यात येणार नसल्यानं ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. NEFT आणि RTGS द्वारे केले जाणारे व्यवहार विनाशुल्क असणार आहेत. यासोबतच NEFTची सुविधा 24 तास उपलब्ध असणार आहे. काही ठरावीक रकमेपर्यंत ही सुविधा मोफत वापरण्याची मुभाही देण्यात आली आहे. त्यापैकी बँकेकडून ग्राहकांना कोणत्या मोफत सुविधांचा लाभ घेता येणार आहे याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. तुम्ही जर स्टेट बँकेचे ग्राहक असाल तर तुम्ही या सुविधांचा लाभ घेऊ शकता. तुम्ही SBI चे BSBD खात्याअंतर्गत तुम्हाला सुविधा मिळू शकतात. तुमच्या खात्यावर पैसे असणं आवश्यक आहे.

ग्राहकांना महिन्याला चार वेळा त्यांच्या खात्यातून पैसे काढण्याची मुभा देत आहे. चार ट्रान्झाक्शनंतर मात्र पैसे आकारण्यात येतील. तसेच तुमचं खातं बंद करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क बँकेकडून आकारलं जाणार नाही. मात्र एसबीआयमध्ये तुमचे कोणतेही इतर खाते असल्यास या सुविधांचा लाभ तुम्हाला घेता येणार नाही असं बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

केंद्र किंवा राज्य सरकारद्वारे तयार करण्यात आलेल्या चेकवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. याशिवाय तुम्हाला बँकेकडून इतरही काही सुविधा दिल्या जाणार आहेत. फक्त अट एकच आहे तुमचं इतर कोणतंही खातं असून नये. तुमचं दुसरं खातं असेल तर तुम्हाला ते 4 महिन्यांमध्ये बंद करावं लागेल.  जर  तुम्ही  ATM कार्ड घरी विसरला असाल तर काळजी करू नका. 
SBI (State Bank of India)ने ग्राहकांसाठी एक नवी सेवा सुरू केली आहे. SBI च्या या सेवेचं नाव आहे, SBI Card Pay. यामध्ये पॉइंट ऑफ सेल्स मशीन्सवर कार्ड न वापरता मोबाइल फोनच्या माध्यमातून बिल देता येतं. बँकेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, या सुविधेचा फायदा ग्राहक त्यांच्या मोबाइलवर एक टॅप करून घेऊ शकता. 
त्यामुळे जर तुम्ही SBI चे ग्राहक असाल तर संधीचा फायदा घ्यायला विसरू नका.  

WebTittle :: Is your account in SBI?


 
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com