पोटात अडकलेला चाकू घेऊन तरुण पोहोचला पोलिस स्टेशनला

पोटात अडकलेला चाकू घेऊन तरुण पोहोचला पोलिस स्टेशनला
nagpur

नागपूरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. येथे एका तरुण चक्क पोटात घुसलेला चाकू घेऊन पोलिस स्टेशनला पोहोचला. त्याला पाहून आजूबाजूचे सर्वजण थक्क झाले. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशियल मीडियावरती व्हायरल होत आहे. या तरुणाच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. ही घटना ठाणाच्या कपिलनगर भागात घडली आहे. या हत्येच्या प्रयत्नात चक्क चाकू तरुणांच्या पोटात राहिला. या जखमी झालेल्या तरुणाचा नाव आहे विनय राबा. मित्रांसोबत झालेल्या वादातून ही घटना घडली आहे. यादरम्यान आणखी दोन मित्र देखील जखमी झाले आहेत.  (The youth reached the police station with a knife stuck in his stomach)

हे देखील पाहा

त्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये मुलाच्या पोटात चाकू दिसत आहे. काही वेळाने हा तरुण पोलिस स्टेशनकडे निघाला असताना तो एका मित्राच्या गादीवर बसला आणि पोलिस स्टेटशनला पोहोचला. तरुणाच्या पोटातून रक्त वाहत आहे. शिवाय त्या झटापटीत त्याच्या चेहऱ्याला दुखापत झाल्याचं दिसत आहे. या व्हिडीओ तेथील प्रत्यक्षदर्शी लोकांनी काढून व्हायरल केला आहे.    
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com