तरुणांना लवकरात लवकर लस द्यावी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची मागणी

तरुणांना लवकरात लवकर लस द्यावी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची मागणी
MNVS

डोंबिवली : जास्तीत जास्त तरुणांना Youth लवकरात लवकर लस द्यावी अशी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेनी MNVS केली आहे. याकरिता हॅशटॅगचा वापर Hashtag करत पंतप्रधान Prime Minister यांना ट्विट केले आहे. वाढत्या कोरोना Corona उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर देशात सुरू करण्यात आलेले लसीकरण Vaccination लसीच्या तुटवड्यामुळे काही ठिकाणी बंद झाले आहे. Youth Should be Vaccinated as soon as Possible MNVS Demands

सर्वच वयोगटातील लोकांना खासकरून युवकांना लसीकरण सुरू करावे अशी मागणी मनसे आमदार आमदार राजू पाटील Raju Patil यांनी केली होती. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना डोंबिवलीने Dombivli  हॅशटॅगच्या वापर करत #VaccinationForYouth #युवकांनालसीकरणसुरूकरा अशी मागणी केली आहे आणि पंतप्रधान यांना ट्विट सुद्धा केले आहे.

 हे देखील पहा -

देशातील जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण व्हावे या उद्देशाने सर्वप्रथम पहिल्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिक त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ४५ वर्षांवरील नागरिक तर तिसऱ्या टप्प्यात १ मे पासून १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले. Youth Should be Vaccinated as soon as Possible MNVS Demands

मात्र लसींच्या तुटवड्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील नागरिकांना दुसरा डोस मिळण्यात अडचणी येत असल्याने तिसऱ्या टप्प्यातील नागरिकांसाठी म्हणजेच तरुणांसाठी सुरू करण्यात आलेले लसीकरण काही दिवसातच बंद करण्यात आले. त्यामुळे युवकांना लसीकरण सुरू करा अशी मागणी  म.न.वि.से. कडून केली जात आहे.

याबाबत म.न.वि.से. शहर अध्यक्ष मिलिंद मदन म्हात्रे यांनी सांगितले की कोणतेही आंदोलन न करता आणि कोरोनाचे नियम पाळून फेसबुक आणि ट्विटरवर आमचे फोटो टाकून, हॅशटॅगच्या वापर करत आम्ही ही मागणी करत आहोत. जास्तीतजास्त तरुणांना लवकरात लवकर लस द्यावी एवढीच आमची मागणी आहे.

Edited By : Krushna Sathe 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com