लसीकरण केंद्रावर तरुणांची पोलिसांसोबत हुज्जत... 

लसीकरण केंद्रावर तरुणांची पोलिसांसोबत हुज्जत... 
Youths fight with police at vaccination center

बीड : शहरातील जिल्हा रुग्णालयाच्या लसीकरण Vaccination केंद्रावर लस घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्या गर्दीला नियंत्रणात  ठेवण्यासाठी पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. Youths fight with police at vaccination center

सकाळी बारा वाजता या ठिकाणी गर्दीला आवरण्यासाठी पोलिसांनी Police नागरिकांना शिस्तीत रांगेत बसून घेण्याचे सांगितले होते. मात्र, यावेळी काही तरुणांनी पोलिसांशी हुज्जत घातली आहे.

हे देखील पहा -

बीडचे Beed पोलीस उपअधीक्षक संतोष वाळके यांना काही तरुणांनी मारहाण केली आहे. या मारहाणीत संतोष वाळके यांच्या मानेजवळ दुखापत झाली आहे. यानंतर पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी लाठीचार्ज देखील केले, तर याचे दृश्य सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली, त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी  हुज्जत घालणाऱ्या तरुणांची चांगलीच धुलाई केली आहे. 

मात्र लसीकरण केंद्रावर झालेल्या गोंधळामुळे वयोवृद्ध Elderly आणि लस घेण्यासाठी आलेल्या महिलांची चांगलीच तारांबळ उडाली होती. एकीकडे लसीकरण सुरळीत चालण्यासाठी प्रयत्न होत असताना, दुसरीकडे लसीकरण केंद्रावरील गोंधळ आणि मारहाण झाल्याने, संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात गोंधळ घालणाऱ्या सहा जणांविरोधात बीड शहर पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Edited By- Digambar Jadhav

 
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com