वांद्रे पूर्वमध्ये कोंग्रेसने बाजी मारत मातोश्रीचा गढ काबीज 

 वांद्रे पूर्वमध्ये कोंग्रेसने बाजी मारत मातोश्रीचा गढ काबीज 


मातोश्रीच्या अंगणात शिवसेनेचा पराभव झालाय. वांद्रे पूर्वमध्ये कोंग्रेसने बाजी मारत मातोश्रीचा गढ काबिज केलाय. या मतदार संघात झिशान सिद्धिकी यांचा विजय झालाय. दरम्यान, तृप्ती सावंत यांनी केलेली बंडखोरी ही शिवसेनेनला चांगलीच महागात पडली आहे.  खरतर या मतदार संघात शिवसेना vs तृप्ती सावंत असा सामना रंगेल अशी चर्चा होती.  मात्र आता आता आलेला निकाल हा वेगळाच आहे. याठिकाणी कॉंग्रेसने बाजी मारलीये.  

महाडेश्वर यांना जनतेने नाकारलं 

मुंबईतील खड्डे असो किंवा मुंबईत पडणारा पाऊस, किंवा अगदी लोकांची समस्या जाणून घेण्यासाठी गेलेल्या महापौरांनी आपलं गाऱ्हाणं मांडणाऱ्या मुलीचाच चक्क हात पकडून तिला धमकावणं. या आणि अश्या अनेक प्रसंगांमुळे विश्वनाथ महाडेश्वर कायमच चर्चेत राहिलेत. याचा कुठेतरी महाडेश्वर यांना फटका बसल्याचं बोललं जातंय

WebTitle : zishan siddhiki won from bandra east constetuency

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com