राजगुरुनगर शहरात चालत्या दुचाकीच्या बॅटरीचा स्फोट...

रोहिदास गाडगे
गुरुवार, 10 जून 2021

शहराच्या मध्यवर्ती भागातून दुचाकीस्वार चिमुकल्या मुलासह दुचाकीवरुन आज सकाळी जात असताना अचानक दुचाकीच्या बॅटरीचा स्फोट झाल्याने गंभीर अपघात झाला आहे.

राजगुरूनगर - शहराच्या मध्यवर्ती भागातून दुचाकीस्वार चिमुकल्या मुलासह दुचाकीवरुन आज सकाळी जात असताना अचानक दुचाकीच्या बॅटरीचा स्फोट Battery blast झाल्याने गंभीर अपघात झाला आहे. या अपघातात Accident चिमुकल्या मुलासह दुचाकीस्वाराच्या पायाला गंभीर दुखापत झाली असुन दोघांनाही उपचारासाठी खाजगी रुग्णालयात Hospital दाखल करण्यात आले आहे. Battery blast of two wheeler in Rajgurunagar city

दूध दरवाढीसाठी महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फटके देत आंदोलन... 

आज सकाळच्या सुमारास संतोष शेवाळे हे आपला मुलगा यश याला दुचाकीवरुन घेऊन जात असताना घरापासून काही अंतरावर ही दुदैवी घटना घडली. या घटनेत दुचाकी चालक संतोष शेवाळे यांच्या कंबरेखाली व दोन्ही पाय फुटुन रक्तबंबाळ झाला तर मुलगा यश यांच्याही दोन्ही पायांना गंभीर जखमा झाल्या आहेत.

हे देखील पहा -

आज सकाळीच्या सुमारास वडील मुलासह आपल्या दुचाकीवरुन प्यायला पाणी आणण्यासाठी जात असताना अचानक दुचाकीच्या बॅटरीचा स्फोट  झाला या अपघातात वडिलांचे दोन्ही पाय फुटले असुन मुलगाही गंभीर जखमी झाला आहे. मात्र अशा पद्धतीने दुचाकीचा अचानक स्फोट  झाल्याने परिसरात खळबळ पसरली आहे. स्फोटानंतर स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती यावेळी जखमी व्यक्ती व मुलाला स्थानिक नागरिकांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. Battery blast of two wheeler in Rajgurunagar city

Edited By - Shivani Tichkule

 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live