बीसीसीआयने आज भारतीय संघ जाहीर केला 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 25 ऑक्टोबर 2019

मुंबई : भारत आणि बांगलादेश यांच्यात होणाऱ्या मालिकेसाठी बीसीसीआयने आज भारतीय संघ जाहीर केला आहे. बांगलादेशचा संघ भारतीय दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात ट्वेंटी20 आणि कसोटी मालिका होणार आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीला ट्वेंटी20 मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. 

ट्वेंटी20 मालिकेसाठी भारतीय संघात संजू सॅमसन आणि शिवम दुबे यांना स्थान देण्यात आले आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा संघाचे नेतृत्त्व करेल. अष्टपैलू हार्दिक पंड्या जखमी असल्याने त्याच्या जागी शिवम दुबेला संघात स्थान मिळाले आहे. तर कोहलीच्या जागी संजूला संघात स्थान देण्यात आले आहे. भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रित बुमरा जखमी असला तरी संघात खलील अहमद, दिपक चहर, शार्दुल ठाकूर यांना स्थान देण्यात आले आहे. फिरकी गोलंदाजीची धूरा युझवेंद्र चहलच्या खांद्यावर असेल. कुलदीप यादवला संघात स्थान देण्यात आलेले नाही. त्याच्याजागी राहुल चहरला संघात स्थान देण्यात आले आहे. कसोटी संघांत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.  

ट्वेंटी20 संघ : रोहित शर्मा, लोकेश राहुल, शिखर धवन, संजू सॅमसन, मनिष पांडे, रिषभ पंत, वॉशिंगटन सुंदर, कृणाल पंड्या, युझवेंद्र चहल, राहुल चहर, दिपक चहर, खलील अहमद, शिवम दुबे, शार्दुल ठाकूर

कसोटी संघ : विराट कोहली, मयांक अगरवाल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, रविचंद्रन अश्विन, महंमद शमी, ईशांत शर्मा, उमेश यादव, शुभमन गिल, रिषभ पंत

Web Title: BCCI declares squad for T20 and test series against Bangladesh

संबंधित बातम्या

Saam TV Live