कोरोना लढ्यासाठी बीसीआय देणार २ हजार आॅक्सिजन काँन्सन्ट्रेटर्स

BCCI.
BCCI.

मुंबई : देशभरात कोरोना Corona विरुद्ध लढा सुरु आहे. या लढ्यासाठी देशातील क्रिकेटची सर्वोच्च नियामक संस्था बोर्ड आॅफ कंट्रोल फाॅर क्रिकेट इन इंडिया (बीसीसीआय) BCCI १० लिटरचे २ हजार आॅक्सिजन काँन्सन्ट्रेटर्स Oxygen Concentrators देणार आहे. भारतात सध्या कोरोनाची दुसरी लाट Corona Second Wave सुरु आहे. त्यात आॅक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेक प्राण गमवावे लागले आहेत. BCCI To Donate Two Thousand Oxygen Concentrators

पुढील काही महिन्यांत बीसीसीय देशाच्या विविध भागात हे काँन्सन्ट्रेटर्स पोहोचविणार आहे. त्यामुळे कोरोनाच्या अत्यवस्थ रुग्णांना त्याचा फायदा होऊन अनेक जीव वाचू शकतील, असे बीसीसीआयने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

हे देखिल पहा

''देशातील वैद्यकीय क्षेत्राने कोरोना काळात केलेल्या अफाट कामाची बीसीसीआयला कल्पना आहे. हे सर्व जण खऱ्या अर्थानं फ्रंटलाईन वाॅरिअर्स आहेत आणि त्यांनी आपल्या सर्वांच्या भोवती सुरक्षेचं कवच उभं केलं आहे. क्रिकेट बोर्डानेही सुरक्षेला प्राधान्य दिले असून देशवासियांचे जीव वाचावेत म्हणून आॅक्सिजन काँन्सन्ट्रेटर्स देण्याचा निर्णय घेतला आहे,'' असे बीसीसीआयचे अध्यक्ष व माजी कसोटीपटू सौरव गांगुली Sourav Ganguly यांनी सांगितले.BCCI To Donate Two Thousand Oxygen Concentrators

याबाबत बीसीसीआयचे मानद सचीव जय शहा Jay Shah म्हणाले, "कोरोनाच्या या काळात आपण सर्वांनी खांद्याला खांदा लावून लढले पाहिजे. देशात वैद्यकीय उपकरणांच्या कमतरतेची जाणीव बीसीसीआयला आहे. आॅक्सिजनच्या पुरवठा आणि मागणी थोडीतरी कमी व्हावी, हा आमचा यात प्रयत्न आहे.आपणा सर्वांनाच या लाटेचा फटका बसला आहे. लसीकरणातून यावर मार्ग निघेल असा माझा विश्वास आहे. सर्वांनी लसीकरण करुन घ्यावं असे माझं आवाहन आहे.
Edited By - Amit Golwalkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com