बीसीसीआयची निवडणूक २३ ऑक्टोबरला

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

नवी दिल्ली:  बीसीसीआयशी संलग्न असलेल्या ३८ राज्य संघटनांनी नवी घटना स्वीकारण्यासंदर्भात जी पावले उचलली आहेत, त्याची माहितीही न्यायालयात सादर करण्यात आली होती. त्यातील २४ राज्य संघटनांनी आपल्या सुधारित घटना नोंदणीकृत करून घेतल्या आहेत. ७ संघटनांनी आपल्या सुधारित घटनांना मंजुरी मिळविली आहे पण ती कागदपत्रे सादर केलेली नाहीत. २ सदस्य प्रशासक समितीच्या संपर्कात आहेत आणि लवकरच ते घटनादुरुस्तीची पूर्ती करतील.

नवी दिल्ली:  बीसीसीआयशी संलग्न असलेल्या ३८ राज्य संघटनांनी नवी घटना स्वीकारण्यासंदर्भात जी पावले उचलली आहेत, त्याची माहितीही न्यायालयात सादर करण्यात आली होती. त्यातील २४ राज्य संघटनांनी आपल्या सुधारित घटना नोंदणीकृत करून घेतल्या आहेत. ७ संघटनांनी आपल्या सुधारित घटनांना मंजुरी मिळविली आहे पण ती कागदपत्रे सादर केलेली नाहीत. २ सदस्य प्रशासक समितीच्या संपर्कात आहेत आणि लवकरच ते घटनादुरुस्तीची पूर्ती करतील.

पुढील महिन्यात २२ ऑक्टोबरला होणारी भारतीय क्रिकेट बोर्डाची निवडणूक आता २३ ऑक्टोबरला होणार आहे. हरयाणा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांमुळे या तारखेत बदल करण्यात आला असल्याचे बीसीसीआयच्या प्रशासक समितीचे प्रमुख विनोद राय यांनी सांगितले.

या दोन्ही राज्यांत २१ ऑक्टोबरला निवडणुका होत आहेत. त्यामुळे या दोन विभागातील संलग्न राज्य संघटनांना बीसीसीआयच्या निवडणुकीत मतदान करताना अडचण होऊ नये म्हणून २२ ऑक्टोबरऐवजी २३ ऑक्टोबरला निवडणुका घेण्याचे ठरले आहे.राय यांनी तामिळनाडू क्रिकेट संघटनेला निवडणुका घेण्याची परवानगी देण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. कालमर्यादेची अट फक्त अध्यक्ष, सचिव आणि खजिनदार या पदाधिकाऱ्यांपुरतीच मर्यादित आहे, याचा चुकीचा अर्थ काढणाऱ्यांची दखल न्यायालयाने घेतली. ७० वयाची अट तसेच भारताबाहेरील पोसपोर्ट बाळगण्यासंदर्भातील अट काढून टाकण्यात आल्याचा अर्थही काढण्यात आला. प्रत्यक्षात तसे काही नाही.

विनोद राय यांनी याबाबत सांगितले की, 'बीसीसीआयच्या निवडणुका वेळेवरच होणार आहेत. केवळ राज्यांतील निवडणुकांचा विचार करता मूळ तारखेत बदल करून ती एकदिवस पुढे ढकलण्यात आली आहे.'
या समितीतील आणखी एक सदस्य डायना एडलजी यांनी सांगितले की, बीसीसीआयच्या निवडणुकांना आणखी विलंब होत असेल तर ते योग्य नाही. पण राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते करावे लागत असेल तर त्याला हरकत नाही. एडलजी म्हणाल्या की, सर्वोच्च न्यायालयाच्या २० सप्टेंबरच्या आदेशानुसार राज्य संघटनांना आपल्या निवडणुका घेण्यासाठी मुदतीत काही सवलत देता येईल पण बीसीसीआयच्या निवडणुका वेळेतच व्हायला हव्यात. महाराष्ट्रातील निवडणुका २१ ऑक्टोबरला होणार असल्यामुळे एक दिवस तारीख पुढे नेण्यात आली आहे. एकीकडे बीसीसीआयच्या निवडणुकीची मुदत एकदिवसाने वाढविलेली असताना बीसीसीआयने राज्य संघटनांच्या निवडणुकीची मुदतही वाढवून ४ ऑक्टोबर केली आहे. सर्व संलग्न संघटनांनी ९ ऑगस्ट २०१८ आणि २० सप्टेंबर २०१९च्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणुका घ्याव्यात. जर बीसीसीआयच्या घटनेनुसार निवडणुका झाल्या नाहीत तर त्या ग्राह्य धरल्या जाणार नाहीत, असेही प्रशासक समितीने म्हटले आहे.
 

Web Title bcci elections on october 23 instead of october 22 coa chief vinod rai
 


संबंधित बातम्या

Saam TV Live