सावधान! कोरोना रुग्णांचा वेग वाढला...वाचा काय आहे सध्याची परिस्थिती?

साम टीव्ही
शनिवार, 13 फेब्रुवारी 2021

 

  1. कोरोना रुग्णांचा वेग वाढला
  2. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली
  3. आरोग्य विभागाची चिंता वाढली

गेल्या काही दिवसांत राज्यातल्या अनेक शहरांत कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढताना दिसतेय. पुण्यासह मुंबई, नागपूर, आणि अमरावती या शहरात कोरोनाचे रुग्ण सरासरीपेक्षा अधिक वेगाने वाढू लागल्याने चिंता वाढलीय. 

राज्यात सध्या अनलॉकची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे जनजीवन वेगाने पूर्वपदावर येतंय. मुंबईत सर्वसामान्य प्रवाशांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आलीय. मात्र त्याचवेळी कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय की काय अशी भीती निर्माण झालीय. कारण राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या सरासरीपेक्षा वाढू लागलीय. 
 

कोरोना डोकं वर काढतोय?

जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून रुग्णसंख्येचा आलेख घसरत दररोज सरासरी अडीच हजार रुग्णसंख्येवर स्थिरावला होता. मात्र गेल्या चार दिवसांपासून दररोजच्या रुग्णसंख्येने साडेतीन हजारांचा टप्पा गाठलाय. राज्यात शुक्रवारी दिवसभरात 3 हजार 670 नव्या रुग्णांचं निदान झालंय. विशेष करून मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक तसंच नागपूर आणि अमरावती या परिसरातील रुग्णांची संख्या वाढू लागलीय. 

कोरोनानंतर आता परिस्थिती हळुहळु पूर्वपदावर येतेय. त्यामुळे दैनंदिन कामासाठी घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढू लागलीय. अनेक ठिकाणी मास्कचा वापर होत नसल्याचं दिसून येतंय. परिणामी कोरोना संसर्गाचा धोकाही वाढलाय. त्यामुळे काळजी घेणं आवश्यक आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live