सावधान ! फळे, भाज्या सॅनिटाईज करू नका! कारण...

साम टीव्ही
गुरुवार, 21 मे 2020
  • सावधान ! फळे, भाज्या सॅनिटाईज करू नका!
  • सॅनिटायझरमधली रसायनं शरिरासाठी घातक
  • फळे, भाज्या सॅनिटाईज केल्यानं आरोग्याच्या तक्रारी

कोरोनाच्या भीतीनं प्रत्येक गोष्ट सॅनिटाईज करुन घेतली जातेय. यात फळं, भाज्याही सॅनिटाईज केल्या जात आहेत. पण ते घातक आहे. असं आम्ही का म्हणतोय? तुम्हीच पाहा..
 

कोरोना विषाणुचा संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येक गोष्ट सॅनिटाईज अर्थात निर्जंतुक केली जाते. यात फळं आणि भाज्या सॅनिटाईजही केल्या जात आहेत. पण फळं आणि भाजीपाला सॅनिटाईज करणं शरिरासाठी धोकादायक आहे. सॅनिटाइयझरमध्ये रसायनं असतात, ती शरीरासाठी घातक असतात.. त्यामुळे फळं, भाजीपाला गरम, कोमट पाण्यातून काढून काही वेळ उघड्यावर ठेवाव्यात असा सल्ला देण्यात आलाय.

कोरोनाचा विषाणू फळे आणि भाजीपाल्यावर 6 ते 8 तासांपर्यंत सक्रिय असतो.  मात्र या वस्तु उन्हात 4 तासांपर्यंत असल्यास हे विषाणू निष्क्रिय होतात. सर्वसाधारणपणे फळं, भाजीपाला आणल्यावर ते हाताळू नका, काही वेळ ते उघड्यावरच ठेवा. त्यानंतर कोमट पाण्यात ते काही वेळ ठेवा. पूर्ण सुरक्षेसाठी त्यात चिमुटभर बेकिंग पावडर किंवा पोटॅशियम परमँग्नेट  टाकायला हवे. ज्यामुळे यात कोरोनाचा विषाणू असल्यास ते नष्ट होतील, असा सल्ला डॉक्टरांनी दिलाय.

काही लोक फळे, भाजीपालाही सॅनिटाईझ करत असल्याचे निदर्शनास येतंय. पण त्यामुळे या वस्तुंच्या पृष्ठभागावर असलेले विषाणू नष्ट होत नाहीत. उलट सॅनिटायझरमधील रसायनांचा अंश त्यात राहिल्यास ते पचनसंस्थेसाठी घातक ठरतात. त्यामुळे तुम्हीही जर फळं, भाजीपाला यावर सॅनिटायझर फवारणी करत असाल, तर तसं करणं तात्काळ थांबवा.


संबंधित बातम्या

Saam TV Live