VIDEO | हाय हिल्सच्या चपला घालताय तर सावधान !

साम टीव्ही न्यूज
बुधवार, 22 जानेवारी 2020

फॅशनचा जमाना आहे...कपडे ज्या रंगाचे त्याच रंगाची आपली चप्पल असावी अशी अनेकांची इच्छा असते...बाजारात फॅशनेबल चपला उपलब्ध आहेत...काही महिला, तरुणी उंच टाचांच्या चपला घालतात...पण, हाय हिल्सच्या चपला घातल्याने आपण आजारी पडू शकतो असा दावा करण्यात आलाय...त्यामुळं व्हायरल मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहा...अनेक मुली सुंदर आणि उंच दिसण्यासाठी हिल्सच्या सँण्डलचा वापर करतात.पण हिल्सचा चपला घालणं हे खूप धोकादायक असतं.त्याने आजारी पडू शकता.

हा महिलांच्या आरोग्याचा प्रश्न असल्यानं याबद्दल अधिक माहिती एक्सपर्ट देऊ शकतात...त्यामुळं आमचे प्रतिनिधी एक्सपर्टना भेटले...त्यांना व्हायरल मेसेज दाखवला आणि हाय हिल्सच्या चपला घातल्याने आरोग्यावर काय परिणाम होतात हे जाणून घेतलं...

उंच हील्समुळे पायाच्या टाचेवर अतिप्रमाणात ताण येतो...परिणामी टाचदुखीची समस्या उद्भवू शकते... याशिवाय पाय मुरगळण्याची शक्यता असते...त्यामुळं हील्सच्या चपला वापरताना काय काळजी घ्यावी हेदेखील आम्ही जाणून घेतलं...त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहा...

ही फॅशन झालीय हाय हिल्स घालण्याची यामुळे गुडघ्याचा त्रास होऊ शकतो

गुडघ्यातील लिक्विड कमी होते आणि घर्षण वाढते

पाठीच्या मसल्सवर ताण आल्यानं पाठीचा त्रास वाढतो

ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होत नाही, त्यामुळं दुखणं वाढते आणि सूज येऊ शकते

त्यामुळं फार काळ हायहिल्स घालू नये, थोडाफार वेळ पार्टी पुरती घालायला हरकत नाही...पेन्सिल हिल सॅण्डल घालण्यापेक्षा पूर्ण भाग उंच असलेली सँडल घालावी...उंच टाचेच्या चपलांमुळे शरीराचं संतुलन बिघडतं...आमच्या पडताळणीत हाय हिल्सच्या चपल्या आपल्याला आजारी पाडू शकतात हा दावा सत्य ठरला...

संजय डाफ साम टीव्ही नागपूर

संबंधित बातम्या

Saam TV Live