VIDEO | मोबाईलमुळे तुम्हाला कोरोना कसा होऊ शकतो, पाहा...

साम टीव्ही
मंगळवार, 13 ऑक्टोबर 2020
  • सावधान! मोबाईलमुळे कोरोनाचा अधिक धोका?
  • मोबाईल, नोटांवर 28 दिवस जिवंत राहतो कोरोना?
  • शास्त्रज्ञांच्या अभ्यासात धक्कादायक निष्कर्ष
     

तुमच्या मोबाईलमुळेच तुम्हाला कोरोना होऊ शकतो. हे ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल. पण, होय, हे खरंय. असा दावा करण्यात आलाय. नक्की काय आहे मोबाईलमुळे कोरोनाचा धोका पाहा.
 

तुमच्या हातातल्या मोबाईलमुळे आणि चलनी नोटांमुळे कोरोनाचा धोका अधिक आहे. कोरोनानं मोबाईल आणि नोटांवरील आपला मुक्काम वाढवलाय. तब्बल 28 दिवस कोरोना व्हायरस मोबाईल आणि चलनी नोटा, स्टेनलेस स्टीलच्या वस्तूंवर जिवंत राहू शकतो असा धक्कादायक निष्कर्ष समोर आलाय. ऑस्ट्रेलियाच्या नॅशनल सायन्स एजन्सीने हे संशोधन जगासमोर मांडलंय. प्रत्येकजण मोबाईल वापरतोय. आणि नोटाही वापरत असल्याने आता कोरोनाला रोखायचं कसं हाच प्रश्न उपस्थित झालाय. नोटांवर आणि मोबाईलवर सॅनिटायझर मारलं तर नोटा आणि मोबाईलही खराब होतो. मग कोरोनाला रोखायचं कसं हे तुम्हीच पाहा.

कोरोनाला कसं रोखायचं?

  • मोबाईल कुठेही ठेवू नका, मोबाईलला कव्हर घाला 
  • मोबाईलला सॅनिटायझर मारलं तर खराब होईल, कव्हरला सॅनिटायझर मारा
  • नोटांचा वापर कमी प्रमाणात करून डिजीटल व्यवहार जास्त करा
  • दुकानातून वस्तू घेताना किंवा पैशांचा व्यवहार करताना जास्त नोटेचा वापर करू नका 
  • अशी काळजी घेतली तर मोबाईल आणि नोटांवर कोरोना व्हायरस बसण्याचा धोका कमी होईल. जर मोबाईल कुठेही ठेवला आणि कोरोना व्हायरस त्यावर बसला तर तो 28 दिवस जिवंत राहतो. त्यामुळे सावधगिरी बाळगा आणि कोरोना रोखा.


संबंधित बातम्या

Saam TV Live