सावधान! तुमच्या वाढलेल्या पोटामुळेही कोरोनाचा धोका वाढतोय...

साम टीव्ही
शुक्रवार, 15 मे 2020

आम्ही घाबरवत नाहीयोत.. पण ही धोक्याची घंटा आहे... याकडे दुर्लक्ष करु नका... अन्यथा कोरोनाच्या विळख्यात सापडलात, तर सुटका होणं कठीण होऊन जाईल...

 घरी राहून अनेकांचं पोट सुटलंय. कित्येकजण ही गोष्ट हसण्यावारीही घेतायत. पण ही गोष्ट इतक्या हलक्यात घेऊन चालणार नाहीये. कारण वाढलेल्या पोटासोबतच कोरोनाचा धोका सुद्धा वाढलाय.

आम्ही घाबरवत नाहीयोत. पण ही धोक्याची घंटा आहे. याकडे दुर्लक्ष करु नका. अन्यथा कोरोनाच्या विळख्यात सापडलात, तर सुटका होणं कठीण होऊन जाईल.

 लठ्ठपणामुळे कोरोनाचा धोका वाढतो

  • जाड लोकांमध्ये मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्त दाबाचे विकार वाढतात
  • या आजारांमुळे कोरोनाचा संसर्ग झालेल्यांच्या उपचारांमधील गुंतागुंत वाढते
  • लठ्ठपणामुळे शरीरात निर्माण होणारी गुंतागुंत आणि त्यातच कोरोनाच्या संसर्गाची भर पडते
  • लठ्ठपणा, इतर विकार आणि कोरोना यांच्यावर एकाच वेळी उपचार करण्याचं आव्हान वैद्यकीय तज्ज्ञांपुढे निर्माण होतं
  • यामुळे शरीराकडून उपचारांना मिळणारा प्रतिसाद मंदावण्याचा धोका असतो

आपण सगळेच घरी आहोत... शरीराची हालचाल नसल्याने, वजन वाढणं स्वाभाविक आहे... पण हा धोका दुर्लक्षून चालणार नाहीये. 

व्हिओ 3 - आपल्याला फक्त कोरोनाशी लढायचं नाहीये... तर यानंतरही असे साथीचे रोग येतील... ज्यासाठी आपल्याला आपलं शरीर सक्षम राखायचंय... तेव्हा सुटलेल्या पोटावरून व्हॉट्सअॅपवर विनोद नक्की फॉरवर्ड करा.. हसणं आरोग्यासाठी चांगलंच.. पण हे करत असतानाच.. सुटलेलं पोट नियंत्रणात आणायचंय हेही लक्षात ठेवा. 


संबंधित बातम्या

Saam TV Live