दुष्काळी बीडच्या बालाघाट पर्वतरांगावर निसर्गाचा अविष्कार !

beed nature
beed nature

बीड - बीड Beed म्हटलं की डोळ्यासमोर उभे राहते ते गडद, पायाला चटका देणारे अन घशाला कोरड निर्माण करणारे भेगाळलेल्या जमिनीचे आणि दुष्काळाचे चित्र ! मात्र आता या दुष्काळी Draught बीड जिल्ह्याची ओळख बदलत आहे. Beauty of nature on Balaghat mountain range of drought stricken Beed 

दुष्काळाच्या छायेत काळवंडून जाणाऱ्या बालाघाटच्या Balaghat पर्वतरांगा, जून महिन्याच्या सुरुवातीला हिरवा शालू ओढवलेल्या दिसत आहेत. तर या नयनरम्य निसर्गाच्या Nature मनमोहक सौंदर्याने Beauty भरलेल्या पर्वतरांगा, आता निसर्गप्रेमींना खुणावत आहेत.

बीडपासून जवळच असणाऱ्या कपिलधार Kapildhar परिसरातील, या बालाघाट पर्वतरांगावरील निसर्ग फुलला आहे. आणि याच निसर्गाच्या सानिध्यात मनसोक्त, मनमोकळेपणानं मोर Peacocks नाचू लागले आहेत. आपला पिसारा फुलवत पर्यटकांना हे मोर एक प्रकारे खुणावत आहेत.

या कपिलधारच्या दऱ्याखोऱ्यात हे मोर मनमोकळे पणाने फिरू अन बागडू लागले आहेत. शेतात रस्त्यावर अगदी काही फुटांच्या अंतरावर हे मोर पाहायला मिळत आहेत.यामुळं जूनच्या सुरुवातीलाच या बालाघाट पर्वतरांगा परिसरात वसलेला निसर्गरम्य कपिलधार परिसर, आता निसर्गप्रेमी अन पर्यटकांना खुणावत आहे. या निसर्गरम्य, मनमोहक दुष्काळी बीडमधील हे विहंगम दृश्य अत्यंत लोभसवाणे वाटत आहे. 

Edited By : Krushnarav Sathe 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com