खाजगी हॉटेल्स मधील बेड्स कोरोना रुग्णांसाठी राखीव, मुंबई महापालिकेचा निर्णय...  

Five Star hotel room
Five Star hotel room

मुंबई : मुंबईत कोरोना Corona रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना रुग्णांना रुग्णालयात, तसेच कोविड Covid केंद्रात खाटा मिळणं कठीण झालं आहे. अनेक खासगी रुग्णालयात विनाकारण लक्षण नसलेले रुग्ण खाटा अडवून ठेवत आहेत . त्यामुळे मुंबई Mumbai महापालिकेने आता रुग्णांच्या उपचारासाठी पंचतारांकित हॉटेलचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. Beds in private hotels reserved for corona patients

त्यामुळे आता खासगी रुग्णालयात भरती होणाऱ्या रुग्णांच्या उपचारासाठी पंचतारांकित हॉटेलचा Hotels वापर केला जाणार आहे . यामुळे ज्या रुग्णांना उपचारासाठी दाखल होण्याची सर्वाधिक गरज आहे, त्यांना खाटा उपलब्ध होतील.  तसेच ज्या रुग्णांना कोरोनाची लक्षणे नाहीत, आणि त्यांना गृहवीलगिकरणात राहायचं नसेल, अशा रुग्णांना हॉटेलमध्ये पाठवण्यात येईल.  

त्यांच्यावर याच हॉटेलमध्ये उपचार केले जातील. अतिदक्षता विभागाची गरज नसणाऱ्या रुग्णांना देखील या हॉटेलमध्ये ठेवलं जाणार आहे . याबाबत लवकरच खासगी रुग्णालय हॉटेलसोबत पालिका करार करणार आहे. या सगळ्या कामांवर देखरेख ठेवण्यासाठी मुंबईच्या २४ वॉर्डांमध्ये नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

मुंबईत कोणकोणत्या हॉटेलचे रुग्णालयात रुपांतर केलं आणि किती रुपये आकारले जाणार आहेत. तर बॉम्बे हॉस्पिटलमधील रुग्णांच्या स्टेप डाऊन फॅसिलीटीसाठी मरिन ड्राईव्ह इथे असलेलं इंटरकॉन्टिनेंटल, एच.एन.रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलसाठी बिकेसी येथील ट्रायडेंट हॉटेल, स्टेप डाऊन फॅसिलीटी दिलेल्या हॉटेल्समध्ये जर रुग्णासोबत एका नातेवाईकाला सोबत राहायचं असेल तर त्यांना ट्विन रुम बुक करुन दिल जाईल. Beds in private hotels reserved for corona patients

स्टेप डाऊन फॅसिलीटीच्या रुग्णांसाठी दर दिवसाला ४००० रुपयापर्यंतचे शुल्क आकारले आहे.  ट्विन रुम हवं असल्यास ६००० रुपये आकारले जातील. ज्या हॉटेल्समध्ये किमान २० खोल्या असतील, तेच हॉटेल स्टेप डाऊन फॅसिलीटी म्हणून खाजगी रूग्णालय वापरु शकणार आहेत.

हॉटेलमधील डॉक्टरांची वेळोवेळी भेट, इतर औषधे आणि वैद्यकिय गरज पुरवणे ही हॉस्पिटलची जबाबदारी असेल. मुंबईत कोरोना उपचारांसाठी केंद्रावरील अपुऱ्या पडणाऱ्या खाटांचा प्रश्न सोडवण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. मुंबईतील खाटांची कमतरता सोडवण्यासाठी खासगी हॉटेल्स मधील खाटा कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवल्या जाणार आहेत. 

पण ही सेवा मध्यमवर्गीयांसाठी किती लाभदायक ठरणार आहे, हा संशोधनाचा प्रश्न आहे. कारण या हॉटेल मधील खोल्यांचा वापर हा उच्चभ्रू कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी होणार आहे, त्यासाठी त्यांच्याकडून पैसेही आकारले जाणार आहेत. आणि त्यांच्यामुळे कदाचित इतर खासगी रुग्णालयात अडवणूक होणाऱ्या खाटा इतरांना वापरता देखील येतील.Beds in private hotels reserved for corona patients

पण सर्वसामान्य रुग्णांना त्याचा किती फायदा होईल हे सांगता येत नाही. कारण उपचार घेण्यासाठी त्यांना पालिकेच्या कोविड केंद्रांवरचं खाटा मिळवण्यासाठी फिरावं लागणार आहे. अशी माहिती मुंबईचे महापौर किशोरी पेडणेकरनी Kishori Pednekar दिली आहे. 

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com