धोकादायक : कोविड सेंटरमधल्या रुग्णांचा बाजारपेठेत वावर

Beed Covid Center Patients Wandering Freely in Market
Beed Covid Center Patients Wandering Freely in Market

बीड :  जिल्ह्यात Beed कोरोना ग्रस्तांची रुग्ण संख्या वाढते आहे. आणि असं असताना देखील नागरिकांना याचं भान नसल्याचं दिसून येतंय. वडवणी इथल्या कोविड सेंटर Covid Center मधील तीन पॉझिटिव्ह रुग्ण बिनबोभाटपणे शहरात फिरत आहेत. हे रुग्ण केवळ शहारत फिरलेच नाही तर यांनी बाजारातून फळ आणि पाण्याच्या बाटल्यांचा बॉक्स देखील खरेदी केला आहे. Beed Covid Center Patients turning to be Super Spreaders

रुग्णच असे बेजबाबदार वागत असतील तर कोरोना Corona नेमका आटोक्यात येणार कसा असाच प्रश्न हा सर्व प्रकार पहिल्यानंतर उपस्थित होतोय. वडवणीच्या कोविड सेंटर मध्ये उपचार घेणारे हे पॉझिटिव्ह रुग्ण असून त्यांनी शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील हात गाड्यावरून फळं खरेदी केली. शिवाय एका दुकानात जाऊन पाण्याच्या बाटल्या देखील खरेदी केल्या. त्यानंतर पुन्हा बिनबोभाटपणे कोविड सेंटर मध्ये दाखल झाले.

याबाबत कोविड सेंटर मधील डॉक्टरांकडून Doctor अधिक माहिती जाणून घेतली, असता या ठिकाणचे रुग्ण ऐकत नसून थेट अंगावर धावून येत असल्याचं त्यांनी सांगण्यात येत आहे. आणि यामुळेच वडवणी पोलीस Police ठाण्यात कोविड सेंटरवर सुरक्षा देण्याच पत्र देण्यात आलं, मात्र कोणतीही सुरक्षा मिळाली नाहीय. या प्रकारामुळं बेजबाबदार रुग्ण सुपर स्प्रेडर ठरत असल्याचं दिसून आलं आहे.
Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com