सर्वपक्षांची निवडणुकीची सुरुवात; लसीकरण केंद्र आणि कोविड टेस्ट केंद्रापासून...   

Political Parties In Dombivali Started Covid Vaccination Centres
Political Parties In Dombivali Started Covid Vaccination Centres

डोंबिवली : कोरोनामुळे Corona केडीएमसी निवडणूक KDMC election पुढे गेली असली तरी, मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी आणि आपण काम करत आहोत हे दाखवण्यासाठी डोंबिवली Dombivli मधील राजकारणी मंडळीनी लसीकरण केंद्र आणि कोविड टेस्ट केंद्र Vaccination Center and Covid Test Center उघडली आहेत. Beginning of all-party elections; Vaccination Center and Covid Testing Center in Dombivali

कोरोनामुळे केडीएमसी निवडणूक पुढे गेली आणि राजकीय पक्षाने आखलेले कार्यक्रम रद्द झाले.मात्र येत्या दिवाळीच्या आसपास निवडणूक लागू शकते असे जाणकारांचे मत आहेत. हेच लक्ष ठेवतच, राजकिय मंडळींनी डोंबिवलीमध्ये विविध ठिकाणी महापालिकेला सोबत घेऊन लसीकरण केंद्र आणि कोविड चाचणी केंद्र सुरू केली आहेत. 

यातूनच मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी आणि आपण काम करत आहोत हे दाखवण्यासाठी डोंबिवलीमधील राजकारणी मंडळी एकही संधी सोडत नाही आहेत. शिवसेनेचे Shivsena नगरसेवक राजेश मोरे यांनी डोंबिवली पूर्वेत आणि पश्चिमेत दीपेश म्हात्रे यांनी महापालिकेलच्या मदतीने लसीकरणं केंद्र प्रथम चालू करत आणि स्वतःचे बॅनर लावत प्रसिद्धी मिळवली.हीच बाब भाजप BJP नगरसेवक यांच्या लक्षात येतात त्यांनी केंद्र सुरू केली.तर मनसेने MNS आजून केंद्र वाढवा अशी मागणी केली आहे.

एकीकडे संपर्क कार्यलयाचा वापर कोविड Covid टेस्ट केंद्र म्हणून केला जातो आहे, तर आपआपल्या प्रभागातील शाळेचा वापर लसीकरण केंद्र म्हणून केला जात आहेत. याबाबत शिवसेना नगरसेवक दीपेश म्हात्रे यांना विचारले, असताना त्यांनी नाव न घेता भाजप नगरसेवकांना टोला हाणत सांगितले. की काही लोकांनी लसीकरण केंद्राचा शिबिर म्हणून करत आहेत. जो येईल नागरिक त्याला लस दिली पाहिजे आणि प्राध्यान दिले पाहिजे, तर हा दावा फेटाळात राजकारण कोणीही करू नये, प्रत्येक प्रभागात लसीकरण केंद्र सुरू करावे. Beginning of all-party elections; Vaccination Center and Covid Testing Center in Dombivali

तर हा दावा फेटाळात राजकारण कोणीही करू नये, प्रत्येक प्रभागात लसीकरण केंद्र सुरू करावे असे भाजप नगरसेविका खुशबू चौधरी यांनी सांगितले. या सेना-भाजपच्या या शीतयुद्धात मनसेने पण उडी मारत आपापल्या प्रभागात लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठीआयुक्तांकडे मागणी केली आहे. याबाबत मनोज घरत यांना विचारले असता त्यांनी सांगितले, की इतर कार्यक्रम आता लावूं शकत नाही. त्यामुळे टेस्टिंग,लसीकरण आणि इतर मदतीद्वारे प्रत्येक पक्षाचा कार्यकर्त्या झटत आहे व पार्ट अँड पार्सल ऑफ पॉलिटिक्स आहे. आता या तिन्ही पक्षातील राजकारणामुळे आणि आपआपसातील स्पर्धमुळे सर्व नागरिकांना लस वेगाने मिळो म्हणजे झाले.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com