महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात ,दुसऱ्या लाटेवेळी महाराष्ट्र बेसावध?

साम टीव्ही
बुधवार, 17 मार्च 2021

कोरोनाची दुसरी लाट आलीय सावधान
महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात
दुसऱ्या लाटेवेळी महाराष्ट्र बेसावध?

राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याचा निष्कर्ष केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं काढलाय. त्याच सोबत राज्यात दररोज दहा ते पंधरा हजार नवे रुग्ण वाढल्यानं आरोद

भाजी बाजारातली ही गर्दी पाहा. रेल्वे स्टेशनवरील ही गर्दी पाहा. महाराष्ट्र एवढा बेसावध असताना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात झालीय. गेल्या काही दिवसांत कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्य़ानं वाढतेय. मुंबई, पुणे, आणि नागपुरात कोरोनाची रुग्णसंख्या रोज दोन हजारांच्या घरात वाढतेय. त्यामुळं केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्य सरकारला कोविड सुविधांवरुन फटकारलंय.  कलेक्टर आणि मनपा आयुक्तांची अॅक्शन टीम स्थापन करा. कंटेनमेंट झोनमध्ये रुग्णांचा शोध घ्यावा. कोरोना बाधितांच्या संपर्कातील 20 ते 30 जणांचा शोध घ्यावा. कोरोनाच्या चाचण्यांचं प्रमाण वाढवावं. होम क्वारंटाईनच्या अंमलबजावणीकडं लक्ष द्यावं. रुग्णसंख्या पाहून कंटेनमेंट झोन तयार करा. रुग्णाला होम क्वारंटाईन करताना त्या घरात कोण हाय रिस्क झोन मधील आहे का याची तपासणी करा. डेथ ऑडिट सुरु करा आणि ज्येष्ठांच्या लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्यात.

दुसरी लाट आलेली असताना फक्त कठोर निर्बंध जाहीर करुन चालणार नाही. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आरोग्य यंत्रणा राबवली पाहिजे शिवाय पोलिसांनीही आता रस्त्यावर उतरुन कामाशिवाय फिरणाऱ्या लोकांना घरात बसवलं पाहिजे.अन्यथा काही दिवसांत परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती व्यक्त करण्यात येतेय.
 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live