ऐन दिवाळीत बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप? 17 ऑक्टोबरला होऊ शकते संपाची घोषणा

भक्ती आंबेरकर
सोमवार, 14 ऑक्टोबर 2019

मुंबई : बेस्ट' बस ही मुंबईची ओळख ..मात्र आता ही सेवा तोट्यात आहे..आणि गेल्या काही दिवसात ही आर्थिक तूट वाढत चालल्याने त्याचा परिणाम कर्मचाऱ्यांवरही होतो..
पगारवाढ तर सोडाच पण महिन्याचा पगारही वेळेत मिळत नाही...इतरही मागण्या आहेतच.....त्यामुळे हे कर्मचारी वारंवार संपाचं हत्यार उपसतात.

आता पुन्हा एकदा  बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने संपाचा इशारा दिलाय...तो ही ऐन दिवाळीत... त्यामुळे बेस्टने प्रवास करणाऱ्यांना पुन्हा गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो...  17 ऑक्टोबरला कामगारांच्या मेळाव्यात या संपाची घोषणा
होऊ शकतो...या मेळाव्यात कामगारांचं मत जाणून घेऊन संपाबाबतचा निर्णय घेऊ असं कृती समितीकडून सांगण्यात आलंय.  .

पण या संपाच्या इशाऱ्याने नियमितपणे बेस्टने प्रवास करणाऱ्यांना धडकी भरलीय...कारण नागरिकांसाठी लोकल ट्रेनपाठोपाठ बेस्ट हा स्वस्तातला आणि सोयीचा पर्याय असतो..रिक्षा, टॅक्सी, मेट्रो, ओला-उबेरचे दर सगळ्यांनाच परवडत नाही. 
त्यामुळे खिशातले पैसे बघून प्रवास करायचा म्हटलं तर बेस्टच सोयीस्कर ठरते...त्यामुळे बेस्ट कामगारांच्या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा निघणं गरजेचं आहे...बेस्ट कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्रशासनासमोर वारंवार मांडूनही
त्यावर तोडगा निघत नसल्याने अखेर पुन्हा एकदा ऐन दिवाळ सणात  बेस्ट कर्मचारी संपावर जाण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live