जल्लोष! बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारात १२ हजारांची वाढ

जल्लोष! बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारात १२ हजारांची वाढ

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये १२ हजारांची वाढ करण्यात आली आहे.  गेल्या अनेक वर्षांपासून पगार वाढीसाठी लढा देणाऱ्या बेस्ट कर्मचाऱ्यांना अखेर यश आले आहे. सातव्या वेतन आयोगाच्या धर्तीवर बेस्ट प्रशासन आणि बेस्ट कामगार सेनेत गुरुवारी वेतन करार झाला. यावेळी हा निर्णय झाला असून या वेतन करारानुसार कामगारांना १७ टक्के वेतनवाढ मिळणार आहे. 


मुंबईतील सर्व आगारामध्ये बेस्ट कर्मचाऱ्यांनी फटाके वाजवत जल्लोष केला आणि पेढे वाटण्यात आले. बेस्टच्या जवळपास ३७ हजार कर्मचाऱ्यांना या पगारवाढीचा फायदा होणार आहे.  पगार वाढ होणार असल्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.  वेतन करारासाठी ११५० कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. 
 १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत हा करार करण्यात आला होता. 


बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसह इतर मागण्यासाठी बेस्ट कामगार कृती समितीने अनेकदा आंदोलन केली आहेत. या मागणीसाठी बेस्ट कामगार कृती समितीचे प्रमुख शशांक राव मंगळवारपासून उपोषणाला बसले होते. 

Web Title:best employee salary increment of 12 thousand

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com