बेस्टच्या संपात एसटी मुंबईकरांच्या मदतीला

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 8 जानेवारी 2019

मुंबई : आज (मंगळवार) मध्यरात्रीपासून बेस्ट कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी संपावर जाण्याचा निर्णय घेतल्याने, प्रवाशांची तारांबळ उडाली आहे. मात्र अशा वेळेत प्रवाशांच्या मदतीला एसटीने धाव घेतली आहे. त्यासाठी मुंबईतील अनेक भागात एसटीने सकाळपासून आतापर्यंत 40 बस सुरु केल्या आहे.

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांची गैरसोय टाळण्यासाठी एसटीने सकाळपासून फेऱ्या सुरू केल्या आहे. त्यासाठी एसटीने सकाळी 10 वाजेपर्यंत 40 बस मार्गावर सोडल्या असून, दिवसभरात हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

एकूण 40 बसेस सध्या धावत आहेत, गरजेनुसार आणखी जादा बसेस सोडण्यात येणार असल्याचे राज्य परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

मार्गावर सध्या 40 बस सुरू केल्या आहेत.
कुर्ला पश्चिम ते बांद्रा -05 बसेस
कुर्ला पूर्व ते चेंबूर - 05 बसेस
दादर ते मंत्रालय - 05 बसेस
पनवेल ते मंत्रालय  - 05 
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मंत्रालय - 05
ठाणे ते  मंत्रालय - 15

Web Title: BEST employee strike in Mumbai

संबंधित बातम्या

Saam TV Live