आदिवासी बांधवाना आता कोरोनाची माहिती मिळणार कोरकू भाषेतून

आदिवासी बांधवाना आता कोरोनाची माहिती मिळणार कोरकू भाषेतून
Amravati Collector to use Korku Langauge for Corona campaign

अमरावती : आदिवासी बांधवांना Tribals कोरोना महामारीची भीषण वास्तविकता ही त्यांच्याच बोलीभाषेतून अर्थात कोरकू भाषेतून समजावून सांगणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज दिली. Amravati Collector to use Korku Langauge for Corona campaign

वाढत्या कोरोनाचा Corona प्रादुर्भाव रोखण्यासाठी सातपुडयाच्या पर्वतरांगेतील गावखेड्यात नाकेबंदी करण्यात आली असून  १९ गावे सिल करण्यात आली आहे. शासनाच्या Maharashtra Governmlent कोणत्याही योजनेपासून कोसो दूर असलेल्या मेळघाटात रोजगाराची साधने नसल्याने स्थलांतरित कुटुंबे होळीच्या Holi निमित्ताने घाटात परतली आणि कोरोनाचा उद्रेक झाला. या उद्रेक मेळघाटमध्ये अनेक गावांमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने झाला. त्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढू लागली आहे. 

अमरावती Amravati जिल्हातील मेळघाट हा आदिवासी भाग कुपोषणासाठी आधीच सर्व राज्यात प्रसिद्ध आहे त्यातच आता या भागात कोरोना चे संक्रमण हे मोठ्या प्रमाणात पसरत आहे या आजारामुळे अनेक नागरिकांचे दुर्देवी मृत्यू होत आहेत. कोरोना विषाणू बद्दलची माहिती व जनजागृती अजूनही मेळघाट मध्ये पाहिजे त्या प्रमाणात आदिवासी बहुल भागात झाली नाही. त्यामुळे कोरोनाने आदिवासी भागात चांगलेच पाय पसरले आहेत.

धारणी आणि चिखलदरा तालुक्यातील चिखलदरा शहरासह सेमाडोह, चिखली, हतरू, चुर्णी, डोमा, काटकुंभ, खंडू खेडा, तर धारणी तालुक्यातील हरिसाल, साद्राबाडी, बिबामल, कुसुमकोट, राणीगाव, सावलीखेडा, बेडाबु, दिया, चाकर्दा आणि धारणी शहरातील हरिहर नगर येथे गावबंदी करण्यात आली आहे. Amravati Collector to use Korku Langauge for Corona campaign

मात्र आता या भागात कोरोनाची माहिती कोरकू भाषेतून देण्यात येणार आहे. कोरकू ही आदिवासी बांधवांची मुख्य भाषा असुन या भाषेमधून कोरोना ची माहिती दिल्यास आदिवासी बांधवांना माहिती मिळेल हाच या मागचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे कोरकू भाषेतून आता मेळघाट मध्ये जनजागृती सोबत पोस्टर,होर्डिंग सुद्धा लावण्यात येणार आहेत. या सोबतच कोरोनाचे रुग्ण हे शहरापेक्षा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात निघत असल्याने आता ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. 

लसीसाठी टोकन सिस्टिम

कोरोनाच्या लसीकरणाच्या Corona Vaccination दरम्यान अनेक सेंटर वर गोधळ उडत आहे. अनेक ठिकाणी लस उपलब्ध राहत नाही. त्यामुळं नागरिकांना आल्या पावले परत जावे लागते. त्यामुळं असा गोंधळ पुढे होऊ नये या करीता आता जिल्ह्यातील ९० टक्के सेंटर वर टोकन सिस्टीम राबविण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी म्हणालेत.

हे देखिल पहा - 

लसीकरणाचा आधी एक डोस ज्या व्यक्तींनी घेतला आहे त्यांना आता दुसरा डोस कसा मिळेल याला प्राधान्य दिले जाणार असल्याचेही जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले. या सोबतच काही तालुक्यात कोविड सेंटर पण नव्याने सुरु करणार असल्याचे ते म्हणाले. Amravati Collector to use Korku Langauge for Corona campaign

ऑक्सिजनचे ऑडिट

कोरोनाच्या रुग्णांना सध्या ऑक्सिजन लावण्याची गरजही मोठ्या प्रमाणात पडत आहे. त्यामुळे शहरातील तीन हॉस्पिटल मध्ये ऑक्सिजन टॅंक बसविण्यात आले आहेत. या सोबतच जिल्ह्यातील इतर हॉस्पिटल मध्ये हा ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येतो त्या सर्वांचे ऑक्सिजनचे ऑडिट करण्यात आले आहे यामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी नसल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले
Editd By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com