टाळेबंदीमुळे लोणावळ्यातील चिक्की सापडलीये संकटात

टाळेबंदीमुळे लोणावळ्यातील चिक्की सापडलीये संकटात
Lonavala Chikki

लोणावळा:  पर्यटन Tourism स्थळ म्हणून ओळखला जाणाऱ्या लोणावळ्यात Lonavala चिक्की Chikki  किती प्रसिद्ध आहे हे वेगळे सांगायला नको. त्यामुळे लोणावळ्यात शेकडो चिक्की व्यावसायिक आहेत. परंतु टाळेबंदीत Lockdown लोणावळा चिक्कीचा व्यवसाय संकटात सापडला आहे. गेल्या वर्षीपासून चिक्की विक्रीला जणू ग्रहण लागलं आहे. त्यामुळे चिक्की विक्रेत्यांची अवस्था मेटाकुटीला आली आहे. Chikki industry in Lonavla in crisis due to lockdown

एकीकडे त्यांना कामगारांचा पगार Salary द्यायचा असतो, तसेच लाईटबिल, अन्न, औषध, प्रशासनाचे कडक नियम, त्यात वरून वेळेवर टॅक्स भरण्याची शासनाची घाई असते. या सर्व गडबडीत लोण्यावळ्यातील चिक्की Chkki व्यावसायिक स्वतःला हरवून बसलेत. यातून बाहेर पडण्याचा मार्ग कधी मोकळा होईल याची सध्या ते वाट पाहत आहेत. 

कोरोनाचं Corona संकट पुन्हा ओढवल्याने व्यावसायिक हतबल झाले. हे पण वर्ष मागच्या वर्षासारखे वाया जाणार की काय ही भीती चिक्की व्यवसायिकांना सतावत आहे. राज्यात अनेक विभागांसाठी सरकारने Government पॅकेज दिले. मात्र आम्हाला कोणतेही मोजक्या सोयी सुविधा असणारे पॅकेज का नाही? अशी आर्त हाक लोणावळ्यातील चिक्की व्यावसायिकांनी व्यक्त केली. जीएसटी, नगरपालिकेचा अनेक कर आमच्यावर लादले गेले मात्र आमची यातून सुटका  काही झाली नाही. अशी खंत व्यक्त केली जात आहे. 

Edited By-Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com