रत्नागिरीत 'एनडीआरएफ'च्या चार टीम दाखल

रत्नागिरीत 'एनडीआरएफ'च्या चार टीम दाखल
NDRF Teams landed in Ratnagiri

रत्नागिरी : रत्नागिरीत Ratnagiri अतीमुसळधार पावसाची Rainfall शक्यता आहे 13 जून पर्यंत रत्नागिरीत आॅरेंज अॅलर्ट Orange Alert जारी करण्यात आला आहे.  जवळपास 200 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस Rains पडण्याची शक्याता वर्तविण्यात आली आहे.

रत्नागिरीत अतीवृष्टीमुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते त्याचबरोबर लँडस्लाईडच्या घटना देखील घडू शकतात. त्यामुळे एडीआरएफची NDRF टीम रत्नागिरीत दाखल झाली आहे. रत्नागिरी ,खेड, चिपळूण आणि राजापूर या ठिकाणी चार टिम दाखल झाल्या आहेत. ज्या ठिकाणी पुरजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते अशा ठिकाणची पाहणी एनडीआरएफ कडून केली जात आहे.

हे देखिल पहा

या चार टीमचं नेतृत्व डेप्युटी कमांडन्ट राकेश मिश्रा करत आहेत. तर रत्नागिरी टीमचं नेतृत्व इन्सपेक्टर शिवप्रसाद राव करत आहेत. 5 महाराष्ट्र बटालीयन पुणे मधील ही टीम आहे. रत्नागिरीतील पुरजन्य भागात या टीमने आज रेकी केली.

त्याचबरोबर ज्या भागात दरड कोसळण्याच्या घटना घडू शकतात त्या ठिकाणची पाहणी देखील एनडीआरएफच्या टीमने केली आहे.रत्नागिरीत पावसामुळे जर कोणती आपत्ती आली तर त्यासाठी एनडीआरएफची टीम पुर्ण पणे सज्ज झाली आहे. 

Edited By - Amit Golwalkar
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com