शिवकालीन 'होना'च्या साक्षीनं शिवराज्याभिषेक सोहळा होतोय साजरा

शिवकालीन 'होना'च्या साक्षीनं शिवराज्याभिषेक सोहळा होतोय साजरा
Chatrapati Shivaji Maharaj Currency

रायगड : यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत दुर्मिळ व अमूल्य अशा ऐतिहासिक शिवकालीन 'होना' च्या साक्षीने साजरा होत आहे. Raigad Chatrapati Shivaji Maharaj Rajyabhishek Din

स्वराज्याचे सार्वभौमत्व व संपन्नतेचे प्रतीक असणारे 'होन' हे केवळ चलन नसून आपली अस्मिता आहे; राष्ट्राचा अमूल्य ऐतिहासिक ठेवा आहे. रायगडच्या पवित्र भूमीत मिळालेल्या या ऐतिहासिक होनाच्या साक्षीनेच यंदाचा राज्याभिषेक सोहळा साजरा होत आहे. 

हे देखिल पहा

रायगडावर आज मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त आहे. रायगड पोलिसांनी शिवभक्तांना आवाहन केलं होतं. आज केवळ २० जणांना रायगडावर प्रवेश दिला गेलाय. शिवराज्याभिषेक सोहळ्याला रायगडावर  छत्रपती शिवाजी महाराजाच्या सिंहासनावर फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. ऐतिहासिक वास्तूला शोभेल अशी आकर्षक विद्युत रोषणाई ही करण्यात आली आहे.

पुण्यातही शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शिवस्वराज्य ध्वज उभारण्यात आला. यावेळी शिवस्वराज्य दिनाच्या औचित्याने घनकचरा, गाव स्वच्छता, नाले सफाई. एक कुटुंब एक शोषखड्डा मोहिमे'चा शुभारंभ यावेळी करण्यात येत आहे. Raigad Chatrapati Shivaji Maharaj Rajyabhishek Din

सातारा जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला. सोशल डिस्टन्स पाळत मोजक्या पदाधिकारी आणि अधिकाऱयांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला. पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते गुढीचे पूजन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबूल उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर करण्यासाठी हा दिन महाविकास आघाडी साजरा करत आहे.
Edited By - Amit Golwalkar

*ताज्या बातम्यासाठी भेट द्या*
*Website* - https://www.saamtv.com/
*Twitter* - https://twitter.com/saamTVnews
*Facebook*- https://www.facebook.com/SaamTV
*टेलिग्राम* -https://www.facebook.com/SaamTV
*ताज्या व्हिडिओंसाठी पहा*
*युट्यूब* - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com