बेस्ट कर्मचारी जाणार संपावर 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

मुंबई: बेस्ट वर्कर्स युनियनकडून सात मागण्या केल्या असून औद्योगिक विवाद कायदा, १९४७ कलम २२(१) अन्वये प्रशासनास नोटीस दिली आहे. यापूर्वी युनियनतर्फे १६ मे २०१६, ६ ऑगस्ट २०१९ रोजी सादर केलेल्या पर्यायी मागण्यांच्या पत्राच्या आधारे बेस्ट वर्कर्स युनियनसोबत वाटाघाटी करून अंतिम करण्याची प्रमुख मागणी आहे. त्या जोडीला बेस्ट वर्कर्स युनियनसोबत जोपर्यंत अंतिम करार होत नाही, तोपर्यंत कर्मचाऱ्यांना १० हजार रुपये अंतरिम वाढ देण्याची मागणी केली आहे.

मुंबई: बेस्ट वर्कर्स युनियनकडून सात मागण्या केल्या असून औद्योगिक विवाद कायदा, १९४७ कलम २२(१) अन्वये प्रशासनास नोटीस दिली आहे. यापूर्वी युनियनतर्फे १६ मे २०१६, ६ ऑगस्ट २०१९ रोजी सादर केलेल्या पर्यायी मागण्यांच्या पत्राच्या आधारे बेस्ट वर्कर्स युनियनसोबत वाटाघाटी करून अंतिम करण्याची प्रमुख मागणी आहे. त्या जोडीला बेस्ट वर्कर्स युनियनसोबत जोपर्यंत अंतिम करार होत नाही, तोपर्यंत कर्मचाऱ्यांना १० हजार रुपये अंतरिम वाढ देण्याची मागणी केली आहे. वेतन कराराबाबत बेस्ट कामगार सेना आणि बेस्ट प्रशासनामध्ये सामंजस्य करार झाला असतानाच, बेस्ट वर्कर्स युनियनने वेतनावरून ९ ऑक्टोबरपासून बेमुदत संपाची हाक दिली आहे. 

त्यासंदर्भात युनियनने प्रशासनास नोटीस पाठवून संप पुकारण्याचा इरादा पक्का असल्याचे स्पष्ट केले आहे.  बेस्ट कामगारांना पालिका कर्मचाऱ्यांस २०१६-१७, १७-१८, १८-१९ मध्ये जाहीर झालेल्या दिवाळी बोनसइतकी रक्कम देण्यात यावी. अनुकंपा भरती तातडीने सुरू करण्यासह बेस्ट बसचा ताफा ३,३३७ इतका करण्यासाठी उपक्रमाने तातडीने स्वत:च्या मालकीच्या बस घ्याव्यात, अशीही मागणी केली आहे. तसेच, बेस्ट उपक्रमाच्या आस्थापना सूचीवरील पदसंख्येनुसार रिक्त जागा तातडीने भरण्याच्या मागणीचाही समावेश आहे. या मागण्यांसाठी बेमुदत संपाची हाक देण्यात आल्याचे बेस्ट वर्कर्स युनियनतर्फे शशांक राव यांनी स्पष्ट केले आहे.

 बेस्ट उपक्रमासंबंधित 'क' अर्थसंकल्प मुंबई पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करण्याच्या ठरावांची अमलबजावणी करण्याचाही मागणीत समावेश आहे.

Web Title bestunion warns of strike 


संबंधित बातम्या

Saam TV Live